मुंबई : ‘दिया और बाती’ फेम कनिष्का सोनीने (Kanishka Soni) नुकताच साजिद खानसंदर्भात एक अत्यंत मोठा खुलासा केलायं. कशाप्रकारे साजिद खानने आपला लैंगिक छळ केला, यावर कनिष्काने मोठे भाष्य करत संपूर्ण स्टोरी शेअर केलीये. साजिद खान (Sajid Khan) बिग बाॅसच्या घरात गेल्यापासून अनेक अभिनेत्री (Actress) आपली भडास काढत आहेत. बिग बाॅसच्या निर्मात्यांसोबतच आता याप्रकरणात सलमान खानला देखील धारेवर धरले जातंय. शर्लिन चोप्रा पाठोपाठ आता कनिष्काही साजिद खानच्याविरोधात मैदानात उतरलीये.
बिग बाॅसच्या घरात साजिद खानला पाहून अनेकांना मोठा धक्काच बसला. अनेक अभिनेत्री तर बिग बाॅसच्या निर्मात्यांवर देखील टीका करत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून साजिद खानवर MeToo चे आरोप सातत्याने केले जात आहेत. कनिष्क सोनीने तर साजिद खानवर अत्यंत गंभीर आरोप करत म्हटले आहे की, मला साजिद खानने घरी बोलून एक विचित्र मागणी केली होती.
कनिष्का सोनीने केलेल्या आरोपमुळे आता बाॅलिवूडमध्ये मोठी खळबळ निर्माण झालीये. इतकेच नव्हे तर कनिष्का सोनी म्हणाली की, साजिद खानमुळे मला भारतामध्येही येण्याची भीती वाटत आहे. कारण साजिद खान काहीही करू शकतो आणि इथले सरकार आणि शासनकर्ते काहीच करू शकत नाहीयेत. कारण साजिद खानची मोठ्या लोकांसोबत खूप ओळख आहे आणि त्याच्याविरोधात कोणीही जात नाही.
साजिद खानवर आरोप करत कनिकाने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय. कनिका म्हणाली की, मला एका कामानिमित्त साजिद खानने त्यांच्या घरी बोलावले होते. मात्र, मी सुरूवातीला त्यांच्या घरी जाण्यास घाबरले होते. परंतू ते म्हणाले की, अजिबात घाबरू नकोस…कारण मी माझ्या आईसोबतच राहतो आणि माझ्या घरी इतरही अनेकजण असतात. त्यानंतर मी त्यांच्या घरी गेले. त्यावेळी मी त्यांना चित्रपटात काम करण्याची इच्छा व्यक्त केली.
विशेष म्हणजे त्यांनी मला चित्रपटात काम करण्याची संधी देतो देखील बोलले. मात्र, यादरम्यान ते मला पोट दाखव असे म्हणाले. मात्र, मी यासाठी त्यांना नकार दिला. मग मला ते म्हणाले की, तू माझ्या चित्रपटात काम नाही करू शकत. त्यानंतर कनिष्का तेथून निघून गेली. मात्र, कनिष्का याप्रकरणानंतर फार घाबरली. इतके दिवस हे सर्व न सांगण्याचे कारण कनिष्काने सांगितले की, मला साजिद खानची भीती वाटते.