मुंबई : धर्मेंद्र (Dharmendra), सनी देओल (Sunny Deol) आणि बॉबी देओल यांच्या ‘अपने’चा सीक्वल ‘अपने 2’ येत आहे. अपने या चित्रपटामध्ये 2 पिढ्या आपल्याला बघायला मिळाल्या. मात्र, आता अपने 2 मध्ये तिसरी पिठी म्हणजेच सनी देओलचा (Karan Deol) मुलगा करण देओल देखील या चित्रपटामध्ये दिसणार आहे. करणने 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या पल पल दिल के पास या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये धडाकेबाज पदार्पण केले होते. करण अजूनही चित्रपटसृष्टीत आपले स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.
वडिलांकडून मिळतायेत करणला अभिनयाचे धडे
बॉलिवूड लाईफच्या रिपोर्टनुसार, सनी देओल करणच्या पुनरागमनासाठी खूप मेहनत घेत आहे. रिपोर्ट्सनुसार जेव्हा सनी देओल त्याच्या गदर 2 चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करेल तेव्हा ‘अपने 2’चे शूटिंग सुरू होईल. सध्या सनी लखनऊमध्ये चित्रपटाच्या 40 दिवसांच्या शेड्यूलचे शूटिंग करत आहे. हे शूटिंग पूर्ण होताच सनी पुन्हा अपने 2 च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. सनी करणला पूर्णपणे तयार करत आहे आणि त्याला त्याचे अभिनय कौशल्य आणखी चांगले करायचे आहे. त्याचवेळी काका म्हणजेच बॉबी देओल करणच्या फिटनेससाठी काम करत आहेत.
करण धमाकेदार पुनरागमन करेल
पल पल दिल के पास या चित्रपटाला मिळालेल्या अत्यल्प प्रतिसादामुळे करण खूप दु:खी झाल्याचे बोलले जात होते. पल पल दिल के पास नंतर करणचा ‘वाले’ हा चित्रपटही गेल्या वर्षी प्रदर्शित झाला होता आणि या चित्रपटालाही चांगला प्रतिसाद मिळाला नाही. पण आता तो स्वतःवर जास्त काम करत असून यावेळी तो प्रेक्षकांची मने जिंकून दाखवणार आहे. पल पल दिल के पास या पहिल्या चित्रपटापूर्वी किंवा हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरही तो फारसा प्रसिद्धीच्या झोतात राहिला नाही.
संबंधित बातम्या :
‘ओला’ने प्रवास करताना शबाना आझमींच्या भाचीला आला भयानक अनुभव; वाचा नेमकं काय घडलं?