मुंबई : एसएस राजामौली (S S Rajamouli) यांच्या ‘आरआरआर’ (RRR) चित्रपटाची रिलीज डेट जवळ येतेय. या चित्रपटात आलिया भट्ट (Alia Bhatt), राम चरण तेज (Ram Charan Tej), ज्युनियर एनटीआर (Junior NTR) मुख्य भूमिकेत आहेत. प्रेक्षकांना चित्रपटाकडे आकर्षित करण्यासाठी निर्माते कामाला लागलेत. या चित्रपटाची चाहत्यांनाही उत्सुकता आहे. गेल्या तीन वर्षांपासून या चित्रपटावर काम सुरू होते. या चित्रपटातून बाहुबली(Bahubali)सारखाच व्यवसाय व्हावा, अशी अपेक्षा निर्मात्यांना आहे.
लाँच इव्हेंट जबरदस्त?
रिपोर्टनुसार, मुंबईत चित्रपटाच्या भव्य लॉन्चिगचा कार्यक्रम करण्याची तयारी सुरू आहे. या कार्यक्रमात सलमान खान खास पाहुणा म्हणून उपस्थित राहणार आहे. लाँच इव्हेंट जबरदस्त कसा होईल, हे पाहिलं जातंय.
चाहत्यांची उत्सुकता वाढली
चित्रपट निर्माता करण जोहर(Karan Johar) ‘फिल्टर कॉफी विथ करण’ (Filte-rr Coffee with Karan) या शोसाठी प्रसिद्ध आहे. लॉन्च इव्हेंट दरम्यान अशीच मुलाखत होईल. दिग्दर्शक संपूर्ण कलाकार आणि क्रू यांच्याशी गप्पा मारतील आणि चाहत्यांसाठी रॅपिड फायर राउंड ठेवतील. करण जोहर आणि ‘RRR’च्या निर्मात्यांनी हे स्पष्ट सांगितलं नसलं तरी या कार्यक्रमाला अनेक कलाकार उपस्थित राहण्याची शक्यता आहे. लॉन्च इव्हेंटबाबत सुरू असलेल्या चर्चांमुळे चाहत्यांची उत्सुकता आणखीच वाढलीय.
7 जानेवारीला होणार रिलीज
RRR 7 जानेवारी 2021ला थिएटरमध्ये रिलीज होईल. आलिया भट्ट, ज्युनियर एनटीआर आणि राम चरण व्यतिरिक्त या चित्रपटात अजय देवगण, श्रिया सरन, रे स्टीव्हनसन, अॅलिसन डुडी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. काही काळापूर्वी निर्मात्यांनी RRRचा ट्रेलर रिलीज केला होता. ट्रेलरमध्ये राम चरण आणि ज्युनियर एनटीआर हे बालपणीचे मित्र आहेत. राम चरण ब्रिटीश अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे तर ज्युनियर एनटीआर देशभक्त आहे. दोघांच्या दमदार अभिनयानं चाहत्यांची उत्सुकता वाढवलीय. आलियानंही तिच्या भूमिकेनं लोकांचं लक्ष वेधून घेतलंय.
बिग बजेट चित्रपट
Rise Roar Revolt (RRR) हा एक बिग बजेट देशभक्तीपर चित्रपट आहे. चित्रपटात स्पेशल इफेक्ट्सचा वापर करण्यात आला आहे. संगीत एमएम किरावानी यांनी दिलंय.