करण जोहर याला ट्रोलर्सचा धसका, चित्रपट रिलीजवर घेतला अत्यंत मोठा निर्णय

| Updated on: Nov 16, 2022 | 3:37 PM

बाॅलिवूडच्या चित्रपटांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवलीये.

करण जोहर याला ट्रोलर्सचा धसका, चित्रपट रिलीजवर घेतला अत्यंत मोठा निर्णय
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बाॅक्स आॅफिसवर बाॅलिवूडचे चित्रपट फ्लाॅप जात आहेत. याची धसकी अनेक बाॅलिवूड चित्रपटाच्या निर्मात्यांनी घेतलीये. याच कारणामुळे बिग बजेटच्या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्याचा सपाटा निर्मात्यांनी लावलाय. बाॅलिवूडच्या चित्रपटांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवलीये. थिएटरमध्ये चित्रपट चालत नाहीयेत. इतकेच नाही तर चित्रपटाचे बजेट काढणेही अवघड होऊन बसले आहे. या सर्व गोष्टींमुळे आता चित्रपट निर्माता करण जोहर याने अत्यंत मोठा निर्णय घेतलाय.

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल, भूमी पेडणेकर आणि कियारा अडवाणी यांचा ‘गोविंद नाम मेरा’ हा चित्रपट रिलीज होण्यासाठी तयार आहे. मात्र, हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित न करण्याचा मोठा निर्णय करण जोहरने घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून करण जोहरच्या चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याची मागणी सातत्याने सोशल मीडियावर केली जात आहे.

अभिनेते आणि अभिनेत्रींचा मुलांना बाॅलिवूडमध्ये करण जोहर लाॅन्च करतो, यामुळे करण जोहर विरोधात लोकांमध्ये संतापाची लाट आहे. यामुळे करण जोहरच्या चित्रपटांची घोषणा झाल्यापासूनच त्याच्यावर बहिष्कार टाकण्याची मागणी सुरू होते.

करण जोहरचा गोविंद नाम मेरा हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज केला जाणार आहे. हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार असल्याचे स्वत: विकी काैशलने सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितले आहे. या पोस्टसोबत विकीने एक व्हिडीओ देखील शेअर केलायं. या व्हिडीओमध्ये विकी करण जोहरसोबत दिसतोय.