मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) अलीकडेच कोरोनाची शिकार झाली आहे. करीनाव्यतिरिक्त तिची मैत्रिण अमृता अरोरा (Amrita Arora), सोहेल खानची पत्नी सीमा खान (Seema Khan) आणि संजय कपूरची पत्नी महीप कपूर (maheep Kapoor) याही कोव्हिड पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. ही बातमी आल्यानंतर करीनाला खूप ट्रोल केले जात आहे. यासोबतच कोरोना असताना बाकीच्या लोकांसोबत पार्टी केल्याचा आरोपही तिच्यावर होत आहे.
आता करीनाच्या टीमकडून एक निवेदन जारी करण्यात आले असून अभिनेत्रीबाबत स्पष्टीकरण देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, ज्या पार्टीत सर्वांनी हजेरी लावली, तेथे एक व्यक्ती आधीच आजारी होती आणि त्यामुळे सर्वांची प्रकृती खालावली आहे.
करीना कपूर खानच्या प्रवक्त्याने एक निवेदन जारी केले आहे. त्यात लिहिले आहे की, ‘लॉकडाऊनच्या काळात करीनाने एका जबाबदार नागरिकाची संपूर्ण जबाबदारी पूर्ण केली आहे. घरातून बाहेर पडल्यावर ती पूर्ण काळजी घ्यायची. हे खेदजनक आहे की, यावेळी ती आणि अमृता अरोरा कोरोनाच्या बळी ठरल्या, यावेळी त्या दोघी मित्रपरिवारासोबत डिनर पार्टीला गेल्या होत्या. ही पार्टी काही मोठी नव्हती. पार्टीत उपस्थित असलेल्यांपैकी एकाला बरे वाटत नव्हते आणि त्याला खोकल्याची समस्या होती. त्या व्यक्तीमुळेच हा विषाणू इतरांमध्ये पसरला असावा. ती व्यक्ती या संपूर्ण प्रकाराल जबाबदार आहे. त्यांनी या पार्टीत यायला नको होते आणि इतरांचा जीव धोक्यात घालायला नको होता.’
निवेदनात पुढे म्हटले आहे की, ‘करीनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे समजताच तिने लगेच स्वतःला क्वारंटाईन केले. ती सर्व आवश्यक खबरदारी आणि प्रोटोकॉल पाळत आहे. ती जबाबदार नागरिक असूनही, तिने नियम मोडले, असा आरोप तिच्यावर व्हावा, हे योग्य नाही. करीना ही एक जबाबदार नागरिक आहे आणि ती तिच्या कुटुंबासाठीही असा धोका पत्करू शकत नाही.’
वास्तविक, नुकतेच करण जोहरने त्याच्या ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटाला 20 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त एका पार्टीचे आयोजन केले होते. पार्टीत करीना, अमृता, मलायका अरोरा, अर्जुन कपूर, करिश्मा कपूर, आलिया भट्ट, महीप कपूर आणि सीमा खान उपस्थित होते. आता करीना, अमृता, सीमा आणि महीप कोरोनाग्रस्त आढळल्यानंतर आलिया, अर्जुन, मलायका आणि करिश्मा यांनाही याची लागण होण्याचा धोका आहे.
या पार्टीपूर्वी करीनाने अमृता, मलायका, रिया कपूर, करिश्मा आणि मसाबा गुप्तासोबतही पार्टी केली होती. आता प्रत्येकाला हे जाणून घ्यायचे आहे की, कोणत्या पार्टीतील कोणत्या व्यक्तीला आधीच कोरोनाची लागण झाली होती. बरं, सध्या करीना घरी क्वारंटाईनवर आहे. तिची दोन्ही मुले तैमूर अली खान आणि जेह देखील घरी आहेत. सैफ अली खान कामानिमित्त घराबाहेर आहे. करीनाचे घर सील करण्यात आले आहे. तसेच, बीएमसीने तिच्या घराबाहेर नोटीस देखील लावली आहे.’
Ti Parat Aaliye | ‘ती परत आलीये’ म्हणजे ‘ती’ नक्की कोण आहे? लवकरच होणार ‘ती’चा पर्दाफाश