करीनाने बहिणीपासून लपवली होती ती गोष्ट, करिश्मा कपूरला बसला होता धक्का

| Updated on: Oct 31, 2024 | 7:45 PM

सैफ आणि करिना यांच्या लग्नाला आता 12 वर्षे झाली आहेत. एवढ्या प्रदीर्घ काळात या दोघांमधील बंध घट्ट होत गेले. पण करीनाने जेव्हा तिचे आणि सैफचे नाते सांगितले तेव्हा करिश्माचे काय झाले हे तुम्हाला माहिती आहे का? तिने कपील शर्मा शोमध्ये याबाबत खुलासा केला होता.

करीनाने बहिणीपासून लपवली होती ती गोष्ट, करिश्मा कपूरला बसला होता धक्का
Follow us on

करीना कपूर आणि सैफ अली खान यांच्या नात्याबाबत जेव्हा लोकांना कळाले त्यावर बरीच चर्चा झाली होती. त्यांच्या फॅन्सला देखील ही गोष्ट कळाली तेव्हा ते चकीत झाले होते. कारण सैफ हा करिना पेक्षा वयाने बराच मोठा होता आणि त्याचा पहिल्या पत्नीपासून घटस्फोट देखील झाला होता. आता करीना कपूर आणि सैफ अली खान यांच्या लग्नाला 12 वर्षे झाली आहेत. 16 ऑक्टोबर 2012 रोजी दोघांनी लग्न केले होते. लग्नानंतर सैफ आणि करीना एकत्र लक्झरी लाइफ जगत आहेत. पण करीनाने जेव्हा करिश्माला तिच्या आणि सैफच्या अफेअरबद्दल पहिल्यांदा सांगितले तेव्हा करिश्माची प्रतिक्रिया काय होती हे अनेकांना माहित नाही. अलीकडेच कपिल शर्मा शोमध्ये दिसलेल्या करिश्माने याबाबत खुलासा केला होता.

करिश्माला बसला होता धक्का

करिश्मा कपिल शर्माच्या नेटफ्लिक्स शोमध्ये पाहुणी म्हणून आली होती. कपिलशी संवाद साधताना करिश्माने सांगितले की, त्या दिवशी करीनाने तिच्या आणि सैफ बद्दल मोकळेपणाने मला सांगितले होते. अभिनेत्री म्हणाली की, ‘मी लंडनमध्ये होते आणि रस्त्याने चालत असताना मला अचानक करिनाने फोन केला. करीना फोनवर म्हणाली की, मला वाटते की मला तुला काही सांगायचे आहे. त्यामुळे तू एकाठिकाणी खाली बस. यावर अभिनेत्री म्हणाली मी रस्त्यावर बसू का? करीना म्हणाली- नाही, एखादी शांत जागा बघ आणि तिथे सोफ्यावर बस.


करिश्माने सांगितले की, ‘शेवटी मला बसण्यासाठी सोफा सापडला. मग मी करीनाला काय ते पटकन सांगायला सांगितले. कारण मी खरेदी करण्यासाठी बाहेर पडले होते. त्यानंतर करिनाने तिच्या आणि सैफच्या नात्याबद्दल सांगितले. करीना म्हणाली की, मी सैफवर प्रेम करते आणि आम्ही एकमेकांना डेट करत आहेत. हे ऐकून मी आश्चर्यचकित झाली.

करीना-सैफला 2 मुले आहेत

करीना कपूर खान आणि सैफ अली खान यांना तैमूर आणि जेह अशी दोन मुले आहेत. सैफला पहिली पत्नी  अमृताकडून सारा आणि इब्राहिम ही दोन मुले आहेत. करिश्मा कपूर शेवटची नेटफ्लिक्स चित्रपट ‘मर्डर मुबारक’मध्ये दिसली होती. या चित्रपटाची बरीच चर्चा झाली पण रिलीज होताच तो काही इतका चालला नाही. तो OTT प्लॅटफॉर्म Netflix वर रिलीज करण्यात आला होता.