मुंबई : करिश्मा कपूर हिने तिच्या करिअरमध्ये आतापर्यंत अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. गेल्या काही काळापासून करिश्मा चित्रपटांपासून दूर आहे. परंतू असे असले तरीही करिश्मा कायच चर्चेत असते. करिश्मा आपल्या चाहत्यांच्या संपर्कात कायम असून चाहत्यांसाठी ती व्हिडीओ आणि फोटो शेअर करते. नुकताच करिश्मा कपूरच्या दिल तो पागल है या चित्रपटाला तब्बल 25 वर्ष झाले आहेत. 17 व्या वर्षींच करिश्माने बाॅलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
करिश्मा कपूरचा एक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. विशेष म्हणजे तिचा हा व्हिडीओ तिच्या चाहत्यांना आवडताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये करिश्मा डान्स करताना दिसत आहे.
करिश्मा ज्या गाण्यावर डान्स करत आहे, ते तिच्याच चित्रपटातील गाणे आहे. एका पार्टीमध्ये करिश्मा आपल्या मैत्रींनीसोबत डान्स करताना दिसत आहे. यावेळी करिश्माचा लूकही खास दिसतोय.
काही दिवसांपूर्वी करिश्मा करीना कपूरसोबत स्पाॅट झाली होती. यावेळी या दोघी पार्टीला जात होत्या. आता करिश्माचा हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.
करिश्मा ले गई ले गई… दिल ले गई…या गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. चाहते या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट करून शेअर करताना दिसत आहे. ले गई ले गई हे करिश्मा कपूरच्या चित्रपटामधील हीट गाणे आहे.