Karnan | ‘इनोव्हेटिव्ह इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’मध्ये धनुषच्या चित्रपटाची बाजी, ‘कर्णन’ने पटकावला ‘सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपटा’चा बहुमान!

| Updated on: Oct 18, 2021 | 12:07 PM

अभिनेता धनुष अभिनीत 'कर्णन' या समीक्षकांनी प्रशंसित केलेल्या तमिळ चित्रपटाने बेंगळुरू येथील इनोव्हेटिव्ह इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपटाचा पुरस्कार पटकावला आहे. इनोव्हेटिव्ह आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे हे चौथे वर्ष होते.

Karnan | ‘इनोव्हेटिव्ह इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’मध्ये धनुषच्या चित्रपटाची बाजी, ‘कर्णन’ने पटकावला ‘सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपटा’चा बहुमान!
Karnan
Follow us on

मुंबई : अभिनेता धनुष अभिनीत ‘कर्णन’ या समीक्षकांनी प्रशंसित केलेल्या तमिळ चित्रपटाने बेंगळुरू येथील इनोव्हेटिव्ह इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपटाचा पुरस्कार पटकावला आहे. इनोव्हेटिव्ह आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे हे चौथे वर्ष होते. तीन दिवस चालणारा हा कार्यक्रम 15 ऑक्टोबर रोजी सुरू झाला आणि 17 ऑक्टोबर रोजी संपला. कार्यक्रमादरम्यान 30 देशांतील 20 देशांमधील 100 पेक्षा जास्त चित्रपट 9 स्क्रीनवर दाखवण्यात आले. दोन तामिळ चित्रपट- कर्णन आणि कट्टील- कार्यक्रमादरम्यान प्रदर्शित झालेल्या चित्रपटांपैकी होते.

मारी सेल्वराज दिग्दर्शित ‘कर्णन’ 9 एप्रिल 2021 रोजी चित्रपटगृहात दाखल झाला होता. नंतर हा चित्रपट 14 मे रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित झाला. चित्रपटाची कथा तामिळनाडूतील एका छोट्या गावाभोवती फिरते. गावात एका कनिष्ठ जातीचे लोक राहत असतात.

पोडियानकुलम या छोट्या गावात पोलिसांच्या अत्याचाराला बळी पडलेल्यांची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात तमिळ सुपरस्टार धनुष निर्भय कर्णन म्हणून दिसतो, जो गावकऱ्यांना क्रूरतेपासून वाचवतो. कर्णन यांनी गावकऱ्यांना दिलेल्या अमानुष वागणुकीविरोधात बंड केले. तो त्यांच्या हक्कांसाठीही लढतो.

कशी आहे चित्रपटाची कथा?

‘कर्णन’ या चित्रपटाची कथा 1997 सालची आहे. हा चित्रपट एका सत्यकथेवर आधारित आहे. तमिळनाडूमधल्या पोडियंकुलम गावात मागासवर्गीय आणि आदिवासी लोक राहतात. या गावात शाळा, दवाखान्यासारख्या कोणत्याही प्राथमिक सुविधा नाहीत. गावालगत एक पक्का रस्ता आहे, अनेक लहान-मोठ्या, साध्या तसेच महागड्या गाड्या या रत्यावरुन धावतात, परंतु एकही बस पोडियंकुलम गावाजवळ थांबत नाही. चित्रपटाच्या कथेची सुरुवात या रस्त्यापासूनच होते. या रस्त्याच्या मधोमध एक लहान मुलगी पडली आहे, तिच्या तोंडातून फेस येतोय, तिला काय झालंय माहिती नाही, ती मरणाला टेकली आहे. परंतु एकही गाडी तिच्यासाठी थांबत नाही. दोन्ही बाजूने अनेक गाड्या ये-जा करतायत पण कुठलीच गाडी तिच्यासाठी थांबत नाही. पाहता पाहता ती प्राण सोडून देते. इथूनच सुरु होतो कर्णन आणि पोडियंकुलम गावाचा संघर्ष.

पोडियंकुलम गावाजवळ कोणतीही बस थांबत नाही, इतकंच काय तर गावाजवळ बस थांबादेखील नाही. त्यामुळे या गावातील लोकांना शेजारच्या मेलूर गावच्या बस स्थानकावर चालत जावं लागतं. तिथूनच त्यांना बस पकडावी लागते. मेलूर गावात सवर्ण, सधन लोक राहतात. येथील सत्ता आणि यंत्रणा मेलूरमधल्या सवर्णांच्या हातात आहे. मेलूरमधल्या काही सत्ताधाऱ्यांच्या दबावामुळेच पोडियंकुलमवासी ग्रामस्थ अनेक सुविधांपासून वंचित आहेत. मेलूरमधील सवर्णांना वाटते की पोडियंकुलमवासियंना सुविधा मिळूच नयेत. तशाच पद्धतीने त्यांना वागणूक दिली जाते. उदाहरणार्थ, बस गावाजवळ थांबत नाही, अशा परिस्थितीत पोडियंकुलमवासियांना मेलूर गावच्या बसस्थानकावर जावे लागते. पोडियंकुलमच्या मागासवर्गीयांना कायम आपले आश्रित ठेवण्यासाठी मेलूर गावचे लोक पोडियंकुलम गावात कुठलीही बस थांबू देत नाही. शाळा-कॉलेजला जाणाऱ्या सर्वच मुला-मुलींना मेलूर गावाच्या बस स्थानकातून गाडी पकडावी लागते. तिथेही पोडियंकुलम मुलींशी छेडछाड होते. कोणी आजारी असेल, गर्भवती स्त्री कळा सोसत गावच्या रस्त्यालगत उभी असेल, इतकंच काय तर शेवटचा घटका मोजत असलेली एखादी व्यक्ती रस्त्यालगत उभी असली तरीदेखील एकही गाडी त्यांच्यासाठी थांबत नाही. चित्रपटाच्या सुरुवातीच्या सीनमध्येच एक लहान मुलगी याच रस्त्याच्या मधोमध पाय घासत जीव सोडते. पण एकही गाडी तिच्या मदतीसाठी थांबत नाही. पुढे याच मुलीचा मुखवटा पोडियंकुलमच्या युद्धाचा चेहरा बनतो. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे हे युद्धदेखील सर्व्हायव्हल स्टोरी आहे. या मेलूरमधल्या सवर्णांना ते कसे मोठे आणि सामर्थ्यवान आहेत हे घोषित करायचं आहे तर पोडियंकुलमचा स्वतःच्या अस्तित्वासाठी संघर्ष सुरु आहे. या संघर्षात किंवा या युद्धात कर्णा (धनुष) हा पोडियंकुलमचा सेनापती बनतो.

संघर्षाची प्रभावी कथा

हा चित्रपट अनेक सामाजिक बाबींना स्पर्श करतो. यामधील एका गरीब गावावार एका सधन आणि सवर्णांच्या गावाकडून अनेक अत्याचार होत आहेत. या गावात कोणीच शिकलेलं नाही. परंतु येथील तरुणांना सरकारी नोकरी हवी आहे. परंतु त्यासाठीही मोठा संघर्ष आहेच. गरीब असलं तरी गावाची स्वतःची एक संस्कृती आणि परंपरा आहेत. या गावातील लोक शीर नसलेल्या देवतेची पूजा करतात. त्या देवासाठी माशाचा बळी देतात. गावातील महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी, भांडणं सोडवण्यासाठी पंच आहेत. गावातील काही ज्येष्ठ आणि समजूतदार लोक पंचांचं काम करतात. त्यांच्या शब्दाला गावकरी मान देतात. चित्रपटातील प्रत्येक पात्र त्या-त्या भूमेकित परफेक्ट बसलं आहे. यासाठी दिग्दर्शकाचं कौतुक करावं लागेल.

हेही वाचा :

Forbes India’s list of most influential : विजय देवरकोंडा आणि समंथा पडले मागे, नॅशनल क्रश रश्मिका मंदना पुन्हा ठरली अव्वल!

Sardar Udham | जिथं तिथं चर्चा विकी कौशलच्या ‘सरदार उधम’ची! ओटीटीवर गाजतोय ‘उधम सिंहं’चा बायोपिक!