मुंबई : हेरी फेरी 3 ची चाहते गेल्या कित्येक वर्षांपासून वाट पाहात आहेत. विशेष म्हणजे चित्रपट निर्माते देखील हेरी फेरी 3 तयार करण्यास उत्सुक आहेत. यावर आता कामही सुरू करण्यात आलंय. मात्र, या चित्रपटामध्ये अक्षय कुमारची जागा कार्तिक आर्यन घेणार असल्याची चर्चा आहे. यामुळे अक्षय कुमार याच्या चाहत्यांमध्ये निराशा बघायला मिळतंय. हा चित्रपट कार्तिक आर्यनच्या अगोदर अभिनेता वरुण धवनला आॅफर करण्यात आला होता. मात्र, वरुणला अक्षय कुमार आणि चित्रपट निर्माता फिरोज नाडियाडवाला यांच्यामध्ये पडायचे नसल्याने त्याने या चित्रपटाला नकार दिला.
हेरी फेरी 3 ला होकार देण्याच्या अगोदर अभिनेता कार्तिक आर्यन याने निर्मात्यांसमोर एक मोठी अट ठेवलीये. कार्तिकने हे स्पष्ट केले आहे की, जोपर्यंत चित्रपटाची स्क्रीप्ट वाचणार नाही, तोपर्यंत चित्रपट साईन करणार नाही.
कार्तिकने हे देखील सांगितले आहे की, त्याचे पात्र हे अक्षय कुमार यांच्या पात्राशी संबंधित नसावे. रिपोर्टनुसार चित्रपट निर्मात्यांनी कार्तिकच्या सर्व अटी मान्य केल्या आहेत. यामुळे आता कार्तिक आर्यन हा हेरी फेरी 3 मध्ये दिसणार हे जवळपास स्पष्ट झालंय.
काही दिवसांपूर्वी स्वत: अक्षय कुमार याने हे स्पष्ट केले होते की, तो हेरी फेरी 3 या चित्रपटामध्ये दिसणार नाहीये. मात्र, हेरी फेरी 3 मध्ये न दिसण्याचे कारणही अक्षयने थेट सांगून टाकले आणि म्हटले की, मला चित्रपटाची स्क्रीप्ट आवडली नाहीये.
अक्षयने सार्वजनिकपणे चित्रपटाची स्क्रीप्ट चांगली नसल्याचे म्हटल्यामुळे फिरोज नाडियाडवाला यांनी नाराजी व्यक्त केली होती. कारण यामुळे चित्रपटाच्या बाॅक्स आॅफिस कलेक्शनवर याचा परिणाम होऊ शकतो असे नाडियाडवाला यांना वाटते.