मुंबई : आपण नेहमीच चित्रपटात अभिनेत्यांनी भूमिकेसाठी शरीर कमावले किंवा वजन घटवले अशा कथा ऐकतो मात्र, काही मोजकेच अभिनेते असे आहेत ज्यांनी भूमिकेच्या आवश्यकतेनुसार वजन वाढवण्यासाठी देखील स्वतःवर वेगळ्या दृष्टिकोनातून काम केले आहे. मागे आमिर खानने (Amir Khan) असे केले होते आणि आता अभिनेता कार्तिक आर्यनने (Kartik Aryan) देखील असेच काहीसे केले आहे.
लोकप्रिय अभिनेता ‘फ्रेडी’साठी करतोय प्रचंड तयारी
जवळपास 10 दिवसांच्या रेकॉर्ड वेळेत आपला चित्रपट ‘धमाका’ पूर्ण केल्यानंतर, या लोकप्रिय अभिनेत्याने ‘फ्रेडी’साठी देखील असेच काहीसे जबरदस्त केले. कार्तिकने जवळपास 12 ते 14 किलो वजन वाढवले आहे, जो एकता कपूरच्या फ्रेडीमधील त्याच्या भूमिकेसाठी आवश्यक होते. ‘फ्रेडी’ हा एक रोमांटिक थ्रिलर असून अनेक अनपेक्षित ट्विस्ट आणि टर्न्सने पुरेपूर असा चित्रपट आहे.
अनेकदा अभिनेत्यांसाठी उत्तम शरीरयष्टी राखणे आवश्यक असते, मात्र जेव्हा कार्तिकला त्याच्या फ्रेडीमधील व्यक्तीरेखेसाठी वजन वाढवण्याची गरज सांगण्यात आले तेव्हा, त्याने यासाठी लगेचच तयारी दर्शवली. कार्तिकाने आपल्या व्यक्तीरेखेच्या आवश्यकतेसाठी आपला ट्रेनर समीर जौरासोबत आपल्या शरीरावर काम करणे सुरू केले. समीरला बॉडी ट्रांसफॉर्मेशनमधील तज्ज्ञ मानण्यात येते आणि त्याने आपल्या ट्रांसफॉर्मेशन जर्नीमध्ये बॉलीवुडच्या अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम केले आहे.
कार्तिक आर्यनसोबतच्या या कामाविषयी समीर म्हणतो, “ट्रांसफॉर्मेशन केवळ बारीक होणे किंवा शरीर कमावणे, इतपतच सीमित नसून कधी-कधी यात शरीरातील फॅट्स वाढवण्याचा देखील समावेश असतो, ज्याला खूपच सुपरवाइज़्ड आणि सुरक्षित पद्धतीने करावे लागते. कार्तिक शिस्त, त्याच्यासाठी बनवण्यात आलेला वर्कआउट प्लान आणि योग्य डाएटसोबत हा लुक प्राप्त करण्यासाठी 14 किलो वजन वाढवण्यासाठी सक्षम होता. त्याचे डेडिकेशन अविश्वसनीय होते कारण तो जेनेटिकली लीन असल्याने आपल्या भूमिकेसाठी एका ठरलेल्या कालावधीत एवढे वजन वाढवणे, खरोखरच कौतुकस्पद आहे. एवढेच नाही तर, फ्रेडीसाठी वाढवलेले वजन त्याने आपल्या आगामी चित्रपटासाठी कमी करणे देखील सुरू केले आहे.”
प्रत्येकजण कार्तिक आर्यनचे कौतुक करतो आहे. कार्तिक राम माधवानी यांच्या एक्शन-थ्रिलर ‘धमाका, शशांक घोषचा रोमांटिक थ्रिलर फ्रेडी आणि हॉरर-कॉमेडी, भूल भुलैयासोबत आणखी काही बहुप्रतीक्षित चित्रपटांचा भाग आहे, ज्याची त्याचे चाहते आतुरतेने वाट पहात आहेत.
संबंधित बातम्या
Zee Marathi Awards | पुरस्कारांचा सोहळा रंगणार, पाहा पुरस्कारांमध्ये कोण बाजी मारणार?
दिवस दुसरा, रंग हिरवा… पाहा ‘देवमाणूस’ फेम ‘मंजुळा’च्या घायाळ करणाऱ्या अदा!