मुंबई : गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) हा चर्चेत आहे. अक्षय कुमार याने हेरा फेरी 3 या चित्रपटाला नकार दिल्यापासून कार्तिक आर्यन चर्चेत आहे. अक्षय कुमार याने जाहिरपणे चित्रपटाला नकार देत कारण सांगून टाकल्याने अनेकांना धक्का बसला. अक्षय कुमार याच्याऐवजी कार्तिक आर्यन हेरा फेरी 3 या चित्रपटात मुख्य भूमिकेत असणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सतत रंगताना दिसत आहेत. मात्र, अजूनही चित्रपटाची टीम ही अक्षय कुमार याच्यासोबत चर्चा करत आहे. कारण अक्षय कुमार याला चित्रपटाची स्क्रीप्ट आवडली नसल्याचे स्वत: अक्षय कुमार याने सांगितले होते. आता कार्तिक आर्यन याचा शहजादा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.
नुकताच शहजादा या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालाय. या ट्रेलरला चाहत्यांचा प्रचंड प्रतिसाद देखील मिळतोय. नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये कार्तिक आर्यन याला दोस्ताना 2 या चित्रपटाच्या वादावर देखील काही प्रश्न विचारण्यात आले आहेत.
शेवटी कार्तिक आर्यन याने दोस्ताना 2 च्या वादावर माैन सोडले असून मोठे भाष्य केले आहे. शहजादा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर करण जोहर याने काैतुक केले आहे.
दोस्ताना 2 या चित्रपटामधून करण जोहर याने कार्तिक आर्यन याला घरचा रस्ता दाखवला आहे. दोस्ताना 2 चित्रपटाच्या वादावर बोलताना कार्तिक आर्यन म्हणाला, असे कधी कधी होते…यावर मी अजूनही काही बोललो नाहीये…
मी माझ्या आईने काही शिकवलेल्या गोष्टी फाॅलो करतो. माझ्या आईने शिकवले आहे की, मोठ्यांमध्ये आणि लहाण्यांमध्ये जेंव्हा वाद होतो. त्यावेळी लहाण्यांनी काही बोलणे टाळायला हवे आणि हिच आपली संस्कृती देखील आहे.
मी हेच फॉलो करतो. मी याबद्दल कधीच बोलत नाही आणि आजही काही बोलायचे नाहीये…यानंतर कार्तिक आर्यन याला विचारण्यात आले की, करण जोहर म्हणाला होता, ज्याला एका चित्रपटासाठी 1.25 लाख रुपये मिळायचे. त्याने चित्रपटासाठी माझ्याकडे 20 कोटी मागितले आणि जेव्हा ते दिले नाही तेव्हा त्याने चित्रपट सोडला…
यावर कार्तिक आर्यन म्हणाला, खरोखरच असे ते बोलले आहेत? बऱ्याच वेळा असे किस्से बाहेर येतात. मात्र, या सर्व सोर्स स्टोरी असतात. यामुळे हे किती सत्य हे पाहणे देखील गरजेचे आहे. मात्र, अशा गोष्टींवर लोक अनेकदा विश्वास ठेवतात.
पुढे कार्तिक आर्यन म्हणाला, परंतू असे कधीच झाले नाही की मी एखादा चित्रपट पैशांसाठी सोडला आहे. हा ही गोष्ट वेगळी की चित्रपटाच्या स्टोरीनंतर एखादा चित्रपट सोडला असेल तर. करण जोहर विषयी भाष्य करणे कार्तिक आर्यन टाळताना दिसला.