Katrina Kaif | सासरच्यांची मनं जिंकायला कतरिना सज्ज, स्वतःच्या हाताने तयार केला गोडाचा पदार्थ!

| Updated on: Dec 17, 2021 | 1:34 PM

लग्नानंतर, कतरिना कैफ (Katrina Kaif) आता तिच्या सासरच्या घरी तिच्या नवीन कुटुंबासोबत खास आणि सुंदर क्षणांचा आनंद घेत आहे. लग्नानंतर कतरिना कैफने स्वतःच्या हाताने रव्याचा शिरा बनवला आहे, ज्याचा फोटोही तिने तिच्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

Katrina Kaif | सासरच्यांची मनं जिंकायला कतरिना सज्ज, स्वतःच्या हाताने तयार केला गोडाचा पदार्थ!
विकी कॅट
Follow us on

मुंबई : लग्नानंतर, कतरिना कैफ (Katrina Kaif) आता तिच्या सासरच्या घरी तिच्या नवीन कुटुंबासोबत खास आणि सुंदर क्षणांचा आनंद घेत आहे. लग्नानंतर कतरिना कैफने स्वतःच्या हाताने रव्याचा शिरा बनवला आहे, ज्याचा फोटोही तिने तिच्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे. कतरिना कैफने तिच्या बाल्कनीतून हा फोटो शेअर केला आणि म्हणाली की, ‘मी बनवले आहे…’

कतरिना कैफ सध्या तिचे वैवाहिक जीवन एन्जॉय करत असून, तिने चाहत्यांना याची झलकही दाखवली आहे. कतरिना कैफने तिच्या इन्स्टा स्टोरीवर स्वतःचा शिरा बनवतानाचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत तिच्या हातात असलेल्या वाटीत शिरा दिसत आहे, जो खूपच स्वादिष्ट वाटत आहे. या फोटोमध्ये कतरिनाच्या हातावर मेहंदीही दिसत आहे.

पाहा पोस्ट :

या फोटोसोबत कतरिनाने एक छोटेसे कॅप्शन लिहिले आहे,  ‘हे मी ते बनवले आहे.’ या फोटोच्या खाली लिहिले आहे, ‘चौका चारधाना’. या फोटोवरून स्पष्ट होत आहे की, कतरिनाही तिचे स्वयंपाकाचे कौशल्य तिच्या सासरच्या मंडळींना दाखवत आहे.

राजस्थानमध्ये पार पडला लग्नसोहळा

कतरिना कैफ आणि विकी कौशल यांचे राजस्थानमध्ये 9 डिसेंबर रोजी लग्न झाले होते, त्यानंतर ते एका खासगी हेलिकॉप्टरने हनीमूनला रवाना झाले होते. लग्नानंतर चार दिवसांनी ते मुंबईला परतले आणि विकी कौशल कतरिनाला त्याच्या अंधेरीच्या घरी घेऊन गेला, जिथे तो लग्नाआधी आपल्या कुटुंबासोबत राहत होता.

लवकरच नव्या घरात शिफ्ट होणार!

असे सांगण्यात येत आहे की, विकी कौशल आणि कतरिना लवकरच त्यांच्या जुहूच्या घरात शिफ्ट होणार आहेत. रिपोर्ट्सनुसार, विकी कौशल या नवीन घरासाठी 8 कोटी रुपये खर्च केले आहेत. विकीने या घरासाठी 5 वर्षांचा करार केला असून, त्यासाठी त्याने 1.75 कोटी रुपयांची सुरक्षा ठेव ठेवल्याचीही चर्चा आहे.

नव्या प्रोजेक्टमध्ये एकत्र झळकणार!

ई-टाइम्सच्या रिपोर्टनुसार, विकी आणि कतरिनाने एकत्र एक नवीन प्रोजेक्ट साइन केला आहे. नवविवाहित जोडपे लवकरच एका जाहिरातीत एकत्र दिसणार आहे. इंडस्ट्रीच्या सूत्रानुसार, विकी आणि कतरिना एका हेल्थ प्रोडक्टच्या शूटमध्ये एकत्र दिसणार आहेत आणि लवकरच त्याचे शूटिंग सुरू करणार आहेत. सूत्रांनी पुढे सांगितले की, विकी आणि कतरिनाने आणखी एका लक्झरी ब्रँडसाठी करार केला आहे.

हेही वाचा :

Miss World 2021 | ‘मिस वर्ल्ड 2021’च्या महाअंतिम सोहळ्यावर कोरोनाचं सावट, मानसा वाराणसीला कोरोनाची लागण!

83 First Movie Review : टीम इंडियाच्या ऐतिहासिक कामगिरीचे सुवर्णक्षण पडद्यावर, 83 इज मास्टरपीस! अभिनयापासून दिग्दर्शनापर्यंत दमदार कामगिरी

RRR : ज्यांच्या जीवनावर RRR चित्रपट बनला, ते ‘अल्लुरी सीताराम राजू’ आणि ‘कोमाराम भीम कोण होते? जाणून घ्या