मुंबई : 90च्या दशकांत रिलीज झालेल्या अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये हरीश कुमार (harish Kumar) दिसले होते, पण काही मोठे चित्रपट केल्यानंतर अभिनेत्याने बॉलिवूडला अलविदा म्हटले. अभिनेता हरीश कुमारने बालकलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्याने यापूर्वी हिंदी, तेलगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते. अभिनेत्यानेने बॉलिवूड आणि प्रादेशिक भाषांमध्ये तब्बल 200हून अधिक चित्रपटांमध्ये काम केल्याचे म्हटले जाते. हरीशने वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी त्याच्या पहिल्या चित्रपटात काम केले. हरीशच्या पहिल्या चित्रपटाचे नाव ‘डेझी’ होते.
अनेक मोठ्या हिट प्रादेशिक चित्रपटांनंतर, जेव्हा हरीशला बॉलिवूडमध्ये पदार्पण करायचे होते, तेव्हा त्याने बॉलिवूडची प्रसिद्ध नायिका करिश्मा कपूरसोबतचा चित्रपट निवडला. 1991मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘प्रेम कैदी ये’ या चित्रपटात हरीश कुमार करिश्मासोबत मुख्य भूमिकेत दिसला होता.
जेव्हा, हरीशने बॉलिवूडमध्ये दमदार एंट्री घेतली, त्यानंतर त्याची कारकीर्द चांगली सुरू झाली होती. यादरम्यान त्याने नाना पाटेकर यांच्यासोबत त्यांच्या ‘तिरंगा’ चित्रपटात काम केले, हा चित्रपट 1992मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटानंतर त्याने अभिनेता गोविंदासोबत ‘कुली नंबर 1’ आणि ‘आंटी नंबर 1’मध्येही काम केले. हरीशने बॉलिवूडमधील अनेक सुपरहिट कलाकारांपेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. परंतु, आजमितीला तो कुठे आहे हे कोणालाही माहिती नाही. त्याने 2011मध्ये गोविंदासोबत पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, पण तो सफल झाला नाही. त्यानंतर त्याने गोविंदासोबत पुन्हा एकदा पुनरागमनाचा प्रयत्न केला, चित्रपटाचे नाव होते ‘आ गया हीरो’, पण दुर्दैवाने हा चित्रपट प्रदर्शितच झाला नाही.
असे म्हटले जाते की, हरीश कुमार आपल्या वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवू शकले नाही, ज्यामुळे त्याचा लुक पूर्णपणे बदलला, वजन हे सर्वात मोठे कारण बनले ज्यामुळे त्याने काम करणे पूर्णपणे बंद केले. बॉलिवूडनंतर त्याला प्रादेशिक सिनेमातही कोणती विशेष संधी देण्यात आली नाही. अनेक माध्यमांच्या अहवालांमध्ये ही गोष्ट सांगितली गेली आहे. परंतु, आजपर्यंत कोणालाही त्यामागील खरे सत्य माहित नाही.
(Khoya Khoya Chand Govinda’s co-actor Harish Kumar difficult to get a new project)
‘केवळ मराठी व्यक्तीरेखा म्हणून मराठी कलाकार असं नको’, सचिन पिळगावकरांनी व्यक्त केली खंत
‘आता काळजाचा ठोका चुकणार नाही तर थांबेल…कायमचा…’, ‘शेवंता’च्या पुनरागमनासाठी चाहते उत्सुक!
‘और बताओ कैसा लगा गाना?’, बादशाह आणि सहदेवचं ‘बचपन का प्यार’ गाणं पाहिलंत?