मुंबई : बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी बॉलिवूडमध्ये दमदार एंट्री घेतल्यानंतर आपल्या स्टाईलने सर्वांना आश्चर्यचकित केले होते. पण, काही काळानंतर त्या अचानक गायब झाल्या. आज आपण बोलत आहोत बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री नाझनीन (Actress Nazneen) यांच्याबद्दल. नाझनीनने 70च्या दशकात चक्क बिकिनी परिधान करत चित्रपटांमध्ये दहशत निर्माण केली होती.
नाझनीन खूप कमी चित्रपटांमध्ये अभिनेत्री म्हणून काम केले. त्यांचा पहिला चित्रपट 1972 मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाचे नाव होते ‘सा-रे-गा-मा-पा’. या चित्रपटासोबत त्यांनी आणखी दोन चित्रपट साईन केले. ‘सा-रे-गा-मा-पा’ ची दिग्दर्शक सत्यन बोस होते, ज्यांच्यासोबत त्या आणखी 2 मोठे चित्रपट करणार होत्या. पण हे चित्रपट पुढे कधीच बनले नाहीत.
पुढे नाझनीन सहाय्यक भूमिकेत खूपवेळा पडद्यावर दिसल्या. या नंतर त्यांना मुख्य भूमिकेची ऑफर दिली गेली नाही, यावरून त्या नेहमीच चिडलेल्या असायच्या. चित्रपटांपूर्वी अभिनेत्री एअर होस्टेस बनण्याचे स्वप्न पाहत होती. पण त्यांच्या आईला वाटले की, आपल्या मुलीसाठी विमान सुरक्षित नाही. ज्यामुळे त्यांनी नाझनीनला एअर होस्टेस बनू दिले नाही. पण, जेव्हा त्यांना काही चित्रपटांमध्ये काम मिळाले तेव्हा त्या या क्षेत्रात पुढे गेल्या.
नाझनीनने आपल्या संपूर्ण कारकिर्दीत केवळ 22 चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘चलते चलते’ हा चित्रपट त्यांच्या हिट चित्रपटांपैकी एक आहे. ‘हैवान’, ‘कोरा कागज’ यांसारख्या चित्रपटांमध्येही अभिनेत्री नाझनीन यांनी काम केले आहे. अनेक दिग्दर्शक म्हणायचे की, या अभिनेत्रीचा चेहरा जया भादुरीसारखाच आहे. यामुळे त्यांना अनेक चित्रपटांमध्ये जयाच्या बहिणीच्या भूमिकेची ऑफरही आली होती.
पण नाझनीन यांना मुख्य भूमिका हवी होती. लोक त्यांच्याकडे फक्त सहायक भूमिकेसाठी येत असत, ज्यामुळे त्या खूप निराश होत्या. अभिनेत्रीने अनेक बी-ग्रेड चित्रपटांमध्ये देखील काम केले, ज्यामुळे त्यांची प्रतिमा देखील खराब झाली. पण, अभिनेत्रीने जेव्हा आपल्या चलते चलते या चित्रपटात बिकिनी परिधान केली, तेव्हा त्या प्रचंड प्रसिद्धी झोतात आल्या होत्या.
त्यांनी आपल्या मुलाखतीत सांगितले होते की, तिने बिकिनी घातली कारण तिला पुन्हा कधीच बहिणींची भूमिका करायची नव्हती. नाझनीनने 1988च्या महाभारतात ‘कुंती’ची भूमिका साकारली होती. पण, आता ही अभिनेत्री कुठे आहे? काय करत आहे? याबद्दल कुणालाच माहिती नाही. त्यांनी स्वतःला इंडस्ट्रीपासून पूर्णपणे दूर केले आणि आता त्या जिवंत आहे की, नाही हे देखील कोणालाही माहित नाही.
‘अजूनही बरसात आहे’ मालिकेत येणार नवं वळण, आदिराजचं मीराला सोडून जाण्यामागचं कारण उलगडणार!
‘शेरशाह’ चित्रपटात झळकणार कियारा आणि सिद्धार्थची परफेक्ट जोडी, पाहा नव्या फोटोशूटचे फोटो