Kiara Advani: कियाराने लग्नाविषयी चाहत्यांकडून मागितला सल्ला; नेमकं काय आहे प्रकरण?

| Updated on: May 10, 2022 | 1:54 PM

आई-बाबांच्या लग्नाचा फोटो पोस्ट करत तिने कॅप्शनमध्ये लग्नाबद्दल लिहिलं आहे. त्यामुळे आता कियारा लग्नबंधनात अडकण्याचा विचार करतेय की काय, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राशी (Siddharth Malhotra) तिचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चा होत्या.

Kiara Advani:  कियाराने लग्नाविषयी चाहत्यांकडून मागितला सल्ला; नेमकं काय आहे प्रकरण?
Kiara Advani
Image Credit source: Facebook
Follow us on

बॉलिवूडमध्ये अल्पावधीतच लोकप्रिय झालेली अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) हिने सोशल मीडियावर नुकताच एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोच्या कॅप्शनने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. कारण कियाराने चक्क चाहत्यांना लग्नाविषयी (Marriage) सल्ला मागितला आहे. आई-बाबांच्या लग्नाचा फोटो पोस्ट करत तिने कॅप्शनमध्ये लग्नाबद्दल लिहिलं आहे. त्यामुळे आता कियारा लग्नबंधनात अडकण्याचा विचार करतेय की काय, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राशी (Siddharth Malhotra) तिचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चा होत्या. याविषयी दोघांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र गेल्या काही वर्षांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत आहेत.

काय आहे कियाराची पोस्ट?

‘माझ्या आईवडिलांचा हा फोटो माझ्या सर्वांत आवडत्या फोटोंपैकी एक आहे. परफेक्ट लग्न म्हणजे काय, हे समजून घेण्यासाठी मी नेहमीच त्या दोघांकडे पाहते. त्यांचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी आहे. आता मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. तसंच, कृपया मला सल्ला द्या, कारण सगळे असं म्हणतात की लग्नानंतर सगळं काही बदलतं. खरंच सगळं बदलतं का?,’ असा प्रश्न तिने नेटकऱ्यांना विचारला आहे. कियाराच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केले आहेत. अभिनेता अंगद बेदीने तिला मस्करीत म्हटलंय, ‘ये, मी तुला सांगतो’. तर आणखी एका कियाराच्या मैत्रिणीने लिहिलं, ‘तुला सगळं सांगायलायच कॉल करतेय’. काहींनी हे चित्रपटाचं प्रमोशन असल्याचंही म्हटलंय.

हे सुद्धा वाचा

पहा फोटो-

सिद्धार्थ आणि कियारा यांनी ‘शेरशाह’ या चित्रपटात एकत्र काम केलं. या चित्रपटातील दोघांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली. कियारा आणि सिद्धार्थने जाहीरपणे अद्याप त्यांच्या रिलेशनशिपची कबुली दिली नाही. मात्र अनेकदा या दोघांना एकत्र पाहिलं गेलंय. नवीन वर्षाच्या सुरुवातीला हे दोघं परदेशात फिरायला गेले होते. यावेळी एअरपोर्टवर पापाराझींनी दोघांना एकत्र पाहिलं होतं. आता ब्रेकअपच्या चर्चांनंतरही दोघांनी सलमानची बहीण अर्पिता खानच्या ईदच्या पार्टीला हजेरी लावली होती. मात्र या पार्टीत दोघांनी पापाराझींसाठी एकमेकांसोबत फोटो काढला नाही.