अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) आणि किरण खेर (Kirron Kher) यांची प्रेमकथा बॉलिवूड (Bollywood) चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. जेव्हा, दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले, तेव्हा दोघंही आधीच विवाहित होते. आपापल्या लग्नात नाखूष किरण आणि अनुपम खेर यांना एकमेकांमध्ये आनंद दिसला आणि दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. किरण आणि अनुपम यांची चंदीगडमध्ये भेट झाली होती. थिएटरदरम्यान दोघंही एकमेकांचे खूप चांगले मित्र झाले. दोघांनाही एकमेकांबद्दल सर्व काही माहित होतं, पण हे माहित नव्हतं की ही मैत्री नंतर प्रेमात बदलणार आहे. आपलं नशीब आजमावण्यासाठी किरण 1980 मध्ये मुंबईत आल्या होत्या. यावेळी त्यांची भेट व्यावसायिक गौतम बेरीशी झाली आणि त्या त्यांच्या प्रेमात पडल्या. दोघांचं लग्न झालं आणि त्यांना मुलगा झाला. किरण आणि गौतमच्या मुलाचं नाव ‘सिकंदर’ आहे.
गौतम आणि किरणचा प्रेम विवाह होता, पण या नात्यात त्या खुश नव्हत्या. त्यांनी आपलं थिएटर चालू ठेवलं. दुसरीकडे अनुपम खेर यांचंही लग्न झाले होतं आणि तेही आपल्या लग्नात आनंदी नव्हते. एकदा अनुपम खेर आणि किरण कोलकात्यात एका नाटकासाठी गेले होते. या भेटीदरम्यान दोघांनीही एकमेकांविषयी प्रेम अनुभवलं. प्रेमाची जाणीव झाल्यानंतर अनुपम खेर यांनी मनातलं बोलण्यात जास्त वेळ घालवला नाही. एक दिवस ते किरणच्या घरी गेले आणि त्यांना सांगितलं की, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. तेव्हाच अनुपम यांनी किरणबद्दलचं आपलं प्रेम व्यक्त केलं. किरण यांनी पती गौतमला आणि अनुपम खेर यांनी त्यांच्या पत्नीला घटस्फोट दिला आणि दोघांनी 1985मध्ये एकमेकांशी लग्न केलं.
1984 साली वयाच्या 29व्या वर्षी अनुपम यांनी सिनोप्सिस या चित्रपटात 65 वर्षीय व्यक्तीची भूमिका साकारली, तेव्हा त्यांना प्रथमच प्रसिद्धी मिळाली. 1985 ते 1988 या काळात त्यांनी बर्याच चित्रपटांमध्ये काम केलं, मात्र त्यांना यश मिळू शकलं नाही. मात्र त्यानंतर अनुपम यांनी तेजाब या चित्रपटात धमाकेदार अभिनय केला आणि त्यांच्या या व्यक्तिरेखेनं लोकांनी मनं जिंकली. त्यानंतर अनुपम यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं. राम लखन, चांदनी, परिंदा, चालबाज, दिल, बीटा आणि डर यासारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. हम आपके हैं कौन, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे आणि कुछ कुछ होता है या चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या कॉमिक अवतारातून चाहत्यांची मनं जिंकली.
हेही वाचा :
“पावनखिंड पाहिला का?”; ‘झुंड’चं कौतुक करणाऱ्या जितेंद्र जोशीला नेटकऱ्याने प्रश्न विचारताच म्हणाला..
‘आग ऐसी लगाई मजा आ गया’ नागराज मंजुळेंच्या ‘झुंड’वरील हे Memes पोट धरून हसवतील!