मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायक किशोर कुमार (Kishore Kumar) यांची आज (4 ऑगस्ट) पुण्यतिथी आहे. किशोर कुमार यांनी सुमारे 1500 चित्रपटांसाठी आपला आवाज दिला. आजही लोक त्यांची गाणी मोठ्या उत्साहाने ऐकतात. किशोर कुमार एक उत्तम गायक असण्याबरोबरच लेखक, चित्रपट निर्माता आणि पटकथा लेखक देखील होते. पण, त्यांच्या प्रोफेशनल लाईफप्रमाणेच त्याच्या पर्सनल लाईफची सुद्धा खूप चर्चा झाली.
किशोर कुमार यांचा जन्म 4 ऑगस्ट 1929 रोजी मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यात झाला. किशोर कुमार यांचे खरे नाव आभास कुमार होते. पण, त्यांना खरी ओळख मिळाली ती फक्त त्यांच्या ऑन स्क्रीन किशोर कुमार नावाने! किशोर कुमार हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात खूप चांगले व्यक्ती होते आणि त्याच वेळी अविभाज्य प्रतिभेने समृद्ध होते. किशोर कुमार आज आपल्यासोबत नसले तरी, त्यांच्या आठवणी लोकांच्या हृदयात कायम जिवंत आहेत.
भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज किशोर कुमार यांचे व्यावसायिक जीवन जितके यशस्वी होते, तितकेच त्यांचे वैयक्तिक आयुष्यही तितकेच गोंधळलेले होते. किशोर कुमार यांचे एकूण चार विवाह झाले. त्यांचे चौथे लग्न लीला चंदावरकर यांच्याशी झाले. किशोर कुमार हे त्यांची चौथी पत्नी लीला चंदावरकर यांच्यापेक्षा जवळपास 20 वर्षांनी मोठे होते. चौथ्या लग्नाच्या वेळी ते 51 वर्षांचे होते. दोघे ‘प्यार अजनबी है’ च्या सेटवर भेटले. त्यांचे पहिले लग्न रुमा घोष, दुसरे लग्न मधुबाला, तिसरे लग्न योगिता बाली आणि चौथे लग्न लीला चंदावरकर यांच्याशी झाले. किशोर कुमारपासून विभक्त झाल्यानंतर योगिता बालीने मिथुन चक्रवर्तीशी लग्न केले.
किशोर कुमारने चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी कधीही संगीताचे प्रशिक्षण घेतले नव्हते. किशोर कुमार यांनी आपल्या कारकिर्दीत सर्व भाषांमध्ये 1500 हून अधिक गाणी गायली आहेत. किशोर कुमारचा भाऊ अशोक कुमारने एका खास मीडिया संभाषणात सांगितले होते की, किशोर कुमार लहानपणी खूप बेसूर गात होते. अशोक कुमार यांच्या मते, किशोर कुमारचा आवाज फाटलेल्या बांबूसारखा होता, पण किशोर कुमारने चित्रपट जगतात आपले स्थान निर्माण केल्यानंतर या गोष्टीवर विश्वास ठेवणे खरोखर कठीण आहे.
किशोर कुमार हे अभिनेता अशोक कुमार यांचे धाकटे भाऊ होते. किशोर कुमार यांचा मोठा भाऊ अशोक कुमार यांच्या 76व्या वाढदिवशी त्यांचे निधन झाले. असे म्हटले जाते की किशोर कुमारला चित्रपट जगतात आणणारा त्याचा मोठा भाऊ होता. वयाच्या 57व्या वर्षी किशोर कुमार यांनी या जगाचा निरोप घेतला होता. असे म्हटले जाते की, किशोर कुमार यांना त्यांच्या भावापेक्षा जास्त पैसे कमवायचे होते आणि त्यांचे स्वप्न पूर्ण झाले कारण किशोर कुमार 70 आणि 80च्या दशकातील सर्वात महागडे गायक होते.
किशोर कुमार यांचा मुलगा अमित कुमार यांनी मीडियाशी संवाद साधताना सांगितले होते की, त्याचे वडील इंग्रजी गाण्यांवर खूप प्रेम करत. ते म्हणाले, ‘किशोर जी यांना इंग्रजी क्लासिक चित्रपट पाहण्याची आवड होती. एकदा त्यांनी अमेरिकेतून अनेक ‘पाश्चात्य’ चित्रपटांच्या कॅसेट आणल्या होत्या. याशिवाय, जर तो कोणत्याही गायकाचा सर्वात मोठा चाहते होते, तर ते केएल सहगल होते. किशोर कुमारला नेहमीच सर्वोत्कृष्ट गायक व्हायचे होते.
‘मर्डर’मध्ये इमरान हाश्मीसोबतचा रोमान्स अजूनही चर्चेत, पाहा आता काय करतेय मल्लिका शेरावत
कधीकाळी महिन्याकाठी मिळायचे केवळ 500 रुपये, आता कोटींच्या संपत्तीचा मालक बनलाय सुनील ग्रोव्हर!