Singer KK: केके यांना अखेरचा निरोप देण्याआधी मुलीची भावूक पोस्ट

| Updated on: Jun 02, 2022 | 5:08 PM

केके यांनी हिंदीसोबतच तमिळ, तेलुगू, कन्नड आणि बंगाली भाषेतही गाणी रेकॉर्ड केली होती. त्यांनी शास्त्रीय संगीताचं प्रशिक्षण घेतलं नव्हतं. दुसऱ्यांची गाणी ऐकत, शिकत त्यांनी आपला प्रवास सुरू केला.

Singer KK: केके यांना अखेरचा निरोप देण्याआधी मुलीची भावूक पोस्ट
Singer KK's daughter
Image Credit source: Instagram
Follow us on

बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक केके (Singer KK) यांच्या पार्थिवावर गुरुवारी दुपारी मुंबईतल्या वर्सोवा इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी फिल्म आणि संगीत विश्वातील दिग्गज मंडळी उपस्थित होती. जावेद अख्तर, शंकर महादेवन, विशाल आणि रेखा भारद्वाज, श्रेया घोषाल, अल्का याज्ञिक, अभिजीत भट्टाचार्य, जावेद अली, हरिहरन यांनी केके यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. वडिलांना अखेरचा निरोप देण्यापूर्वी केके यांच्या मुलीने (KK daughter) भावूक पोस्ट लिहिली. केके यांची मुलगी तामरा (Taamara) आणि त्यांची पत्नी ज्योती यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवर ही पोस्ट लिहिली. केके यांच्या अंत्यविधीबाबतची माहिती देताना त्यांनी फोटोसुद्धा शेअर केला.

‘लव्ह यू फॉरेव्हर डॅड’ अशी पोस्ट केके यांच्या मुलीने लिहिली आणि तीच पोस्ट केके यांची पत्नी ज्योती यांनी शेअर केली. कोलकातामधील नजरुल मंच इथं एका कॉलेजच्या कार्यक्रमात परफॉर्म करताना केके यांना हृदयविकाराचा झटका आला. केके यांना दीर्घकाळापासून हृदयाशी संबंधित समस्या होत्या, असं त्यांच्या शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आलं आहे. सलमान खान, करीना कपूर, प्रियांका चोप्रा, दिया मिर्झा, अक्षय कुमार, अजय देवगण, शनाया कपूर, विशाल भारद्वाज यांसारख्या अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित त्यांना श्रद्धांजली वाहिली.

केके यांच्या मुलीची पोस्ट-

हे सुद्धा वाचा

केके यांनी हिंदीसोबतच तमिळ, तेलुगू, कन्नड आणि बंगाली भाषेतही गाणी रेकॉर्ड केली होती. त्यांनी शास्त्रीय संगीताचं प्रशिक्षण घेतलं नव्हतं. दुसऱ्यांची गाणी ऐकत, शिकत त्यांनी आपला प्रवास सुरू केला. 1994 मध्ये मुंबईत आलेल्या केके यांना संगीतकार-गायक लेस्ली लेवीस यांनी संधी दिली. एकाच वर्षी प्रदर्शित झालेल्या केके यांच्या ‘पल’ आणि ‘तडप तडप के’ या गाण्यांनी अभूतपूर्व यश मिळविला.