गेल्या तीन दशकांपासून भारतीय संगीतप्रेमींचं कान तृप्त करणारे, अनेक हिट गाणी देणारे देशातले प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नथ ऊर्फ केके (KK) यांचं मंगळवारी (31 मे) निधन झालं. वयाच्या 53 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोलकातामधील (Kolkata) एका कॉन्सर्टदरम्यान त्यांची प्रकृती बिघडली. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आलं. केके यांनी बॉलिवूडमधील अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत. रोमँटिक गाणी ही त्यांची खासियत होती. आजही त्यांची गाणी तरुणांमध्ये लोकप्रिय आहेत. अशातच केके यांच्या निधनानंतर ट्विटरवर अचानक बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी (Emraan Hashmi) ट्रेंड होऊ लागला. ट्विटर युजर्स केके आणि इमरान हाश्मी या जोडीच्या गाण्यांना शेअर करत आहेत. इमरान हाश्मीसाठी केके यांनी अनेक गाणी गायली आहेत. हीच गाणी शेअर करत नेटकऱ्यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.
‘इमरान आणि केके यांची जोडी कमाल होती. अशी गाणी बॉलिवूडला दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. तुम्ही सदैव आमच्या हृदयात राहाल’, अशा शब्दांत ट्विटर युजर्सनी भावना व्यक्त केल्या. काहींनी केके आणि इमरान हाश्मी यांची प्ले लिस्टसुद्धा शेअर केली. इमरान हाश्मीने त्याचा आवाज गमावला, असंही काही नेटकऱ्यांनी म्हटलंय.
Back to childhood days, I used to think that I used to think it’s #EmraanHashmi who’s singing while dancing. But it was legendary #KK #KKLIVE
— Nirbheek Narayan Agrawal (@NirbheekA) June 1, 2022
When mohammed rafi sahab died .. shammi kapoor lost his voice .. #Kk died and i feel emraan hashmi has lost his voice
These two were literally their voices in songs#Kk #EmraanHashmi #emraan #ripkk #Kolkata— Salman Shaikh (@Shaikhsalman1st) May 31, 2022
KK + Emraan Hashmi = Heaven for 2000s kids ?#RIP #RIPKK #Kolkata #EmraanHashmi #Bollywood #KKsinger
— The Vella Guy (@thedigitalwizz) May 31, 2022
Voice of #EmraanHashmi big losses ?? #RIPKK pic.twitter.com/7X11kkUV9V
— Mr. Karan Mannu (@KaranMannu10) May 31, 2022
नव्वदोत्तरीच्या इंडीपॉप चळवळीतून केके पुढे आले होते. 1999 मध्ये ‘पल’ या म्युझिक अल्बमद्वारे केके यांची भारतीय संगीतप्रेमींना ओळख झाली होती. त्यातील ‘यारो, दोस्ती’ हे गाणं प्रचंड गाजलं होतं. त्यानंतर त्यांनी एकापाठोपाठ एक सरस गाणी दिली.