मुंबई : बाॅलिवूड अभिनेता सलमान खान हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या आगामी किसी का भाई किसी की जान (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. सलमान खान याचा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर काय धमाल करतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे. शाहरूख खान (Shah Rukh Khan) याच्या पठाण चित्रपटामध्ये सलमान खान याची एक झलक चाहत्यांना बघायला मिळाली. पठाण ज्यावेळी अडचणीत येतो, त्यावेळी सलमान खान त्याच्या मदतीला धावून गेल्याचे दाखवण्यात आले. विशेष म्हणजे शाहरूख खान आणि सलमान खान (Salman Khan) यांना सोबत पाहून चाहते आनंदी झाले.
किसी का भाई किसी की जान या सलमान खान याच्या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये क्रेझ बघायला मिळत आहे. हा चित्रपट 21 एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. हा सलमान खान याचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट आहे. सलमान खान याच्या या चित्रपटामधून श्वेता तिवारी हिची मुलगी पलक तिवारी आणि बिग बाॅस फेम शहनाज गिल ही बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत.
विशेष म्हणजे सलमान खान याच्या चित्रपटामध्ये साऊथ स्टार राम चरण याची झलकही प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. एका गाण्यामध्ये राम चरण याने केमिओ केला आहे. मात्र, फक्त काही मिनिटांच्या केमिओसाठी राम चरण याने तगडी फिस घेतलीये. राम चरण याने केमिओसाठी तब्बल 3 कोटी फिस घेतली आहे. Yentamma गाण्यामध्ये राम चरण सलमान खान याच्यासोबत दिसणार आहे.
किसी का भाई किसी की जान या चित्रपटासाठी सलमान खान याने तब्बल 50 कोटी फिस घेतली असून इतकेच नाही तर चित्रपटाच्या नफ्यामध्येही सलमान खान याचा वाटा आहे. सलमान खान याच्यासोबत या चित्रपटामध्ये पूजा हेगडे ही मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटासाठी पूजा हेगडे हिने 6 कोटी फिस घेतली आहे. शहनाज गिल हिने चित्रपटासाठी 50 लाख रूपये फिस घेतली आहे.
जगपति बाबूने या चित्रपटासाठी 2 कोटी फिस घेतलीये. किसी का भाई किसी की जान हा सलमान खान याचा अत्यंत बिग बजेट चित्रपट आहे. या चित्रपटाकडून कमाईच्या मोठ्या अपेक्षा हा निर्मात्यांना आहेत. हा चित्रपट काय धमाका करतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे. सलमान खान आणि पूजा हेगडे चर्चेत आहेत. एक चर्चा सातत्याने सुरू आहे की, पूजा हेगडे आणि सलमान खान हे एकमेकांना डेट करत आहेत.