Box Office | फोन भूत चित्रपटाचे दुसऱ्या दिवशीही बाॅक्स ऑफिस कलेक्शन गारच!

| Updated on: Nov 06, 2022 | 10:35 AM

कतरिना कैफच्या फोन भूत चित्रपटाचे दुसऱ्या दिवशीचे बाॅक्स ऑफिस कलेक्शन पुढे आले असून दुसऱ्या दिवशीही चित्रपटाला काही खास कमाल करता आली नाहीये.

Box Office | फोन भूत चित्रपटाचे दुसऱ्या दिवशीही बाॅक्स ऑफिस कलेक्शन गारच!
Follow us on

मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ गेल्या काही दिवसांपासून तिच्या फोन भूत चित्रपटाचे प्रमोशन करण्यात व्यस्त आहे. शुक्रवारी कतरिनाचा फोन भूत हा चित्रपट रिलीज झालाय. याचदिवशी कतरिनासोबतच जान्हवी कपूर आणि सोनाक्षी सिन्हा यांचे देखील चित्रपट रिलीज झाले आहेत. शुक्रवारी बाॅक्स ऑफिसवर धमाका होईल, अशी अपेक्षा बाॅलिवूड क्षेत्रातील अनेकांना होती. मात्र, तिन्ही चित्रपटांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे.

कतरिना कैफच्या फोन भूत चित्रपटाचे दुसऱ्या दिवशीचे बाॅक्स ऑफिस कलेक्शन पुढे आले असून दुसऱ्या दिवशीही चित्रपटाला काही खास कमाल करता आली नाहीये. या चित्रपटात कतरिना कैफसोबत ईशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदी महत्वाच्या भूमिकेत आहेत. फोन भूत चित्रपटाची सुरूवातीपासून प्रचंड चर्चा होती. मात्र, प्रत्यक्षात चित्रपट रिलीज झाल्यावर काहीच धमाका झाला नाहीये.

फोन भूत चित्रपटाने ओपनिंग डेला जवळपास 2 कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी शनिवारी (5 नोव्हेंबर) चित्रपटाने बाॅक्स ऑफिसवर 2.55 कोटींची कमाई केलीये, हा आकडा सुरूवातीचा आहे, यामुळे यामध्ये थोडा बदल होऊ शकतो. दोन दिवसांचे मिळून आतापर्यंत फोन भूत चित्रपटाने 4.60 कोटींची कमाई केलीये. मिली, डबल XL यामध्ये सर्वाधिक कमाई फोन भूत चित्रपट करतोय. डबल XL चे बाॅक्स ऑफिस कलेक्शन अत्यंत निराशाजनक आहे.