Hrithik Saba: हृतिक रोशनची गर्लफ्रेंड सबा आझादविषयी या 10 गोष्टी माहित आहेत का?
अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि सबा आझाद (Saba Azad) यांच्या आणखी एका व्हायरल व्हिडीओमुळे नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. नुकतंच या दोघांना विमानतळावर हातात हात घालून चालताना पाहिलं गेलं.
Hrithik Roshan and Saba Azad
Image Credit source: Instagram
Follow us on
अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि सबा आझाद(Saba Azad) यांच्या आणखी एका व्हायरल व्हिडीओमुळे नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. नुकतंच या दोघांना विमानतळावर हातात हात घालून चालताना पाहिलं गेलं. त्यामुळे चर्चा काय, हे दोघं एकमेकांना डेट करत आहेत, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी लिहिल्या. हृतिक आणि सबामधील वयाचं अंतर याआधी चर्चेचा विषय होता. या दोघांमध्ये जवळपास 17 वर्षांचं अंतर आहे. या दोघांची भेट कशी झाली आणि त्यांच्या प्रेमकहाणीला कशी सुरुवात झाली, याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. अभिनेत्रीसोबतच सबा उत्तम गायिकासुद्धा आहे. जाणून घेऊयात तिच्याविषयी काही खास गोष्टी..
सबा आझादचं खरं नाव सबा सिंग गरेवाल आहे.
भारतातील प्रसिद्ध नाट्य कलाकार आणि कम्युनिस्ट नाटककार सफदर हाश्मी यांची ती भाची आहे.
सबाने तिच्या दिवंगत काकाच्या दिल्लीतील जन नाट्यमंच या थिएटर ग्रुपमधून तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे तिने हबीब तन्वीर आणि एम.के. रैना यांच्यासोबत काम केलं.
दिल्लीहून मुंबईत आल्यानंतर सबाने पृथ्वी थिएटरमध्ये मकरंद देशपांडे दिग्दर्शित एका नाटकात काम केलं.
इशान नायर दिग्दर्शित ‘गुरूर’ हा तिचा पहिला चित्रपट होता.
तिने 2008 मध्ये अनिल सिनियरच्या ‘दिल कबड्डी’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यामध्ये इरफान, राहुल बोस आणि सोहा अली खान यांच्यादेखील भूमिका होत्या.
इंडियन इंडी म्युझिक सीनमधील ती लोकप्रिय संगीतकार आणि गायिका आहे. 2012 मध्ये तिने अभिनेता आणि संगीतकार इमाद शाहसोबत मॅडबॉय/मिंक हा इलेक्ट्रॉनिक बँड सुरू केला. हा बँड तरुणाईत प्रचंड लोकप्रिय आहे.
सबा आणि इमान शाह यांनी सात वर्षे एकमेकांना डेट केलं. 2010 मध्ये या दोघांचं ब्रेकअप झालं. ब्रेकअपनंतरही सबा आणि इमान हे म्युझिक पार्टनर्स म्हणून एकत्र काम करतात.
सबाने 2010 मध्ये ‘द स्किन्स’ ही तिची स्वतःची थिएटर कंपनी सुरू केली. लव्हप्युक या तिच्या पहिल्या नाटकाचं दिग्दर्शन तिने केलं होतं.