मुंबई : अभिनेता आणि कथित समीक्षक कमल राशिद खान (KRK) नेहमीच त्याच्या बेधडक वक्तव्यांमुळे सोशल मीडियावर बराच चर्चेत असतो. अशा लोकांपैकी केआरकेचे एक नाव आहे, जो त्याच्या सोशल मीडिया पोस्टमुळे नेहमीच चर्चेत राहतो. अशा परिस्थितीत यावेळी केआरकेने रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्या लग्नाविषयी ट्विट केले आहे.
या ट्विट नंतर केआरके पुन्हा एकदा ट्रोल होत आहे. या आधीही त्याने सलमान खानच्या ‘राधे’ विषयी ट्विट करत वाद ओढवून घेतला होता. यानंतर त्याने मिका सिंगशी देखील पंगा घेतला होता.
वास्तविक केआरकेने त्याच्या ट्विटरवर एक भविष्यवाणी पोस्ट केली आहे. केआरकेने त्यांच्या ट्विटमध्ये बर्याच गोष्टी लिहिल्या आहेत. अशा स्थितीत केआरकेने रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाविषयी भविष्यवाणी केली आहे. केआरकेने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘रणबीर कपूर आणि आलिया भट्ट 2022च्या अखेरीस लग्न करणार आहेत. पण, रणबीर कपूर लग्नाच्या अवघ्या 15 वर्षांतच आलियाशी घटस्फोट घेईल. म्हणजेच केआरकेच्या म्हणण्यानुसार, 2037 पूर्वी रणबीर आलियाशी घटस्फोट घेईल.
Prediction 08- Ranbir Kapoor and Alia Bhatt will get married max till end of 2022. But Ranbir Kapoor will divorce her within 15 years after marriage!
— KRK (@kamaalrkhan) July 13, 2021
सोशल मीडियावर केआररके आलिया-रणबीरच्या लग्नानंतर घटस्फोटाच्या अंदाजाबद्दल बर्यापैकी ट्रोल होत आहे. सोशल मीडियावर केआरकेला ट्रोल केले जाण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही तो बर्याच वेळा ट्रोल झाला आहे.
Fir tum bolte ho ki log tumko gaali kyu dete hai ?
— Harsh Sharma (@harshrsharma29) July 13, 2021
Waise tumhari shaadi kaise huyi??? Definitely gaon mein bina dekhe huyi hogi kiyun ki woh dekh leti toh kabhi shaadi nahin karti tumse ?????
— Anil Tewarson (@anil_tewarson) July 13, 2021
अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट लवकरच ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात दिसणार आहेत. रणबीर-आलियाबरोबर अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉयदेखील या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. कोरोनामुळे हा चित्रपट बर्याच वेळा पुढे ढकलला गेला आहे. चित्रपटाशी संबंधित काही फोटो आणि व्हिडीओ अनेकवेळा सोशल मीडियावर व्हायरलही झाले आहेत.
(KRK predict Alia Ranbir Wedding and their divorce get trolled on social media)
Throwback | ‘मला मृत्यूचं भय वाटत नाही पण..’, जेव्हा सुशांत त्याच्या भीतीविषयी बोलतो…