येत्या 4 मार्च रोजी नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित ‘झुंड’ (Jhund) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची मुख्य भूमिका आहे. तर ‘झुंड’च्या निमित्ताने ‘सैराट’ या चित्रपटाची टीम पुन्हा एकदा एकत्र आली आहे. नागराज मंजुळे, रिंकू राजगुरू, आकाश ठोसर यांच्यासोबतच ‘सैराट’चे संगीत दिग्दर्शक अजय-अतुल हेसुद्धा ‘झुंड’साठी काम करत आहेत. ‘सैराट’मधल्या गाण्यांनी फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभरात भुरळ घातली होती. आजही ही गाणी आवडीने ऐकली जातात. ‘झिंगाट’ हे गाणं आजही पार्ट्यांमध्ये वाजवलं जातं. त्यामुळे ‘झुंड’मधील गाणी अशाच पद्धतीने हिट होणार असल्याची उत्सुकता चाहत्यांमध्ये आहे. अमिताभ बच्चन यांनी या गाण्याचा टीझर ट्विटरवर पोस्ट केला आहे. ‘तैयार हो जाओ एक धमाकेदार खेल के लिए’, असं कॅप्शन देत त्यांनी ‘लात मार’ (Laat Maar song) या गाण्याचा टीझर पोस्ट केला आहे.
या गाण्याच्या टीझरमध्ये, फुटबॉलचा खेळ सुरू होण्याआधी बिग बी टॉस करताना दिसत आहेत. गुरुवारी म्हणजेच 3 मार्च रोजी हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला सोशल मीडियावर जबरदस्त प्रतिसाद मिळाला. येत्या ४ मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यामध्ये अनेक मराठी कलाकारांचे चेहरे पहायला मिळतात. झुंडच्या निमित्ताने ‘सैराट’ या चित्रपटाची टीम म्हणजेच रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर पुन्हा एकदा एकत्र आले आहेत.
T 4208 – Taiyaar ho jaao ek dhamakedaar khel ke liye #LaatMaat, out tomorrow. ?https://t.co/8EuhkR4tgk
See you in cinemas on 4th March 2022
— Amitabh Bachchan (@SrBachchan) March 2, 2022
सत्य घटनेवर आधारित चित्रपट
अमिताभ बच्चन हे एका क्रीडा प्रशिक्षकाची भूमिका साकारत आहेत. झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांना निवृत्त फुटबॉल प्रशिक्षक विजय बारसे भेटतात आणि त्यांचं आयुष्य बदलून टाकतात, अशी या चित्रपटाची कथा आहे. नागराज मंजुळे यांनी या चित्रपटाची स्क्रीप्ट लिहिण्यासाठी जवळपास दोन वर्षांचा वेळ घेतला. बिग बींना नजरेसमोर ठेवूनच त्यांनी ही स्क्रीप्ट लिहिली.
संबंधित बातम्या: भारत मतलब? नागराज मंजुळेंच्या ‘झुंड’चा याड लावणारा ट्रेलर एकदा पाहाच!