मुंबई : आपल्या आवडत्या बाॅलिवूड (Bollywood) स्टारसाठी चाहते कधी काय करतील याचा अजिबात नेम नाहीये. शाहरूख खान आणि सलमान खान यांच्या वाढदिवसाला चाहते देशातील प्रत्येक कोणातून मुंबईमध्ये दाखल होतात. आपल्या आवडत्या स्टारची एक झलक पाहण्यासाठी चाहते कायमच आतुर असतात. जर आपला आवडत्या स्टार अचानक आपल्या समोर आला तर काय करावे हे अनेकदा चाहत्यांना कळत देखील नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते आपल्या आवडत्या स्टारच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न कायमच करतात. सध्या सोशल मीडियावर अभिनेता आदित्य रॉय कपूर (Aditya Roy Kapur) याचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये आदित्य रॉय कपूर आणि त्याच्या काही चाहत्या दिसत आहेत. आदित्य रॉय कपूर सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतो. तो आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर कायम शेअर करतो. विशेष म्हणजे आदित्य रॉय कपूर याची फॅन फाॅलोइंग देखील सोशल मीडियावर जबरदस्त बघायला मिळते.
सध्या आदित्य रॉय कपूर हा त्याच्या आगामी द नाइट मॅनेजर या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. बुधवारी मुंबईमध्ये या वेब सीरिजचे स्क्रिनिंग पार पडले. यासाठी आदित्य रॉय कपूर याच्यासह वेब सीरिजची संपूर्ण स्टारकास्ट पोहचली होती.
स्क्रिनिंग संपल्यानंतर आदित्य रॉय कपूर हा बाहेर पडत असताना त्याला पाहून काही महिला चाहत्या त्याच्या भोवती जमल्या. यावेळी एका महिलेने आदित्य रॉय कपूर याच्यासोबत सेल्फी घेतला.
आदित्य रॉय कपूर याच्या भोवती गर्दी जमत होती. मात्र, यादरम्यानच एका महिलेने आदित्य रॉय कपूर याची किस घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, ज्यावेळी आदित्य रॉय कपूर याच्या लक्षात आले की, ही महिला आपली किस घेत आहे, तेंव्हा तो दूर गेला.
WTH ??❤️#AdityaRoykapur pic.twitter.com/NjKH6AtnQV
— AdiShe (@AdiSheOfficial) February 15, 2023
या महिलेला अगदी प्रेमाने आपल्या जवळून बाजूला आदित्य रॉय कपूर याने केले. या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी या महिलेचे हे रूप पाहून टिकाही केलीये.
या व्हिडीओवर कमेंट करत एका युजर्सने लिहिले की, या महिलेने केलेले हे कृत्य अत्यंत चुकीचे आहे. कोणतीही महिला सरळ अशाप्रकारे कशी किस घेऊ शकते.
या व्हिडिओमध्ये आदित्य रॉय कपूर याने पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि निळ्या रंगाच्या पँट घातली आहे. सेल्फी घेतल्यानंतर ती आदित्य रॉय कपूरला किस करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.