मुंबई : बॉलिवूडचे शहेनशाह अर्थात ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी 11 ऑक्टोबर रोजी वाढदिवसानिमित्त पान मसाला कंपनी कमला पसंदसोबतचा करार रद्द केला होता. दरम्यान, आता अमिताभ बच्चन यांनी पान मसाला कंपनीला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. ज्या पान मसालाच्या जाहिरातीमध्ये अमिताभ बच्चन आहेत. त्या जाहिराती तात्काळ थांबवाव्यात म्हणजेच त्यांचे प्रसारण थांबवावे, अशी मागणी केली असल्याचे समोर आले आहे.
अमिताभ बच्चन यांनी कमला पसंद कंपनीसोबतचा त्यांचा करार संपुष्टात आणताना, हे सरोगेट जाहिरातींच्या अंतर्गत येत असल्याची माहिती त्यांना नव्हती, असे सांगितले होते. यानंतर अमिताभ यांनी एक चांगला निर्णय घेत पान मसाला कंपनीला त्यांच्या जाहिराती बंद करण्यासाठी कायदेशीर नोटीस पाठवली आहे. ईटाइम्सच्या अहवाल असे सुचवितो की, पान मसाला ब्रँड कमला पसंदने अमिताभ बच्चन असलेल्या टीव्ही जाहिरातींचे प्रसारण सुरूच ठेवले आहे.
जाणून घ्या अमिताभ यांनी करार का संपवला?
रिपोर्टमध्ये असे लिहिले आहे की, अमिताभ बच्चन यांच्या कार्यालयातून असे समजले आहे की कमला पसंद यांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे, ज्यात अमिताभ बच्चन यांच्या टीव्ही जाहिरातींचे प्रसारण तात्काळ थांबवण्यास सांगितले आहे. कंपनीसोबतचा करार संपुष्टात आणताना अमिताभ बच्चन यांनी जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, कमला पसंद जाहिरात प्रसारित झाल्यानंतर काही दिवसांनी अमिताभ बच्चन यांनी ब्रँडशी संपर्क साधला आणि करार रद्द केला.
अमिताभ बच्चन यांना त्यांच्या पान मसाल्याच्या जाहिरातीमुळे खूप दिवसांपासून ट्रोल केले जात होते. त्यानंतरच त्यांनी हे मोठे पाऊल उचलले होते. पान मसाला ब्रँडसोबतचा करार संपल्यावरही त्यांना ट्रोल करण्यात आले होते. यावर आपली भूमिका मांडताना अमिताभ म्हणाले होते की, हा मनोरंजन व्यवसायाचा भाग आहे, ज्यामुळे अनेकांना रोजगार मिळतो.
संबंधित बातम्या :
इंदिरा गांधींनी खलिस्तानींना मच्छरासारखं चिरडलं, कंगनाच्या विधानाने अकाली दल भडकली; गुन्हा दाखल