विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) आणि अनन्या पांडे (Ananya Panday) यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘लायगर’च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनची (Liger Box Office Collection) सुरुवात ठीक झाली. 25 ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. पहिल्याच दिवशी प्रेक्षक-समीक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली. अनन्याच्या अभिनयावरून तिला ट्विटरवर ट्रोलदेखील करण्यात आलं. गुरुवार आणि शुक्रवार या दोन दिवसांत ‘लायगर’ने 5.75 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. ही फक्त हिंदी व्हर्जनची कमाई आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने कमाईबाबतची ही माहिती दिली. ‘लायगर’ हा विजयचा बॉलिवूडमधील पहिला चित्रपट आहे. त्यामुळे या चित्रपटाकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा होत्या.
गुरुवार (प्रिव्ह्यू शोज)- 1.25 कोटी रुपये
शुक्रवार- 4.50 कोटी रुपये
एकूण- 5.75 कोटी रुपये
#Liger opens to mixed response on Day 1… Good/ fair in mass pockets, dull/ordinary at metros/multiplexes… Needs to improve its performance on Sat and Sun… Thu [preview shows] 1.25 cr, Fri ₹ 4.50 cr. Total: ₹ 5.75 cr. #India biz. Note: #Hindi version. pic.twitter.com/GAD0k9IdGR
— taran adarsh (@taran_adarsh) August 27, 2022
मेट्रो आणि मल्टिप्लेक्समध्ये या चित्रपटाची जेमतेमच कमाई झाली. शनिवारी आणि रविवारी कमाईच्या आकड्यात वाढ होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. ‘लायगर’ प्रदर्शित होण्याआधी ट्विटरवर ‘बॉयकॉट लायगर’चा ट्रेंड होता. त्याचाही फटका कमाईला बसल्याची शक्यता आहे. ‘वर्ड ऑफ माऊथ’चाही वीकेंडच्या कमाईवर प्रभाव पडू शकतो.
विजयने 17 शहरांमध्ये या चित्रपटाचं प्रमोशन केलं आहे. या प्रत्येक शहरातील प्रमोशनच्या कार्यक्रमात विजयची एक झलक पाहण्यासाठी चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या चित्रपटाचं बजेट जवळपास 90 कोटींच्या घरात असल्याची माहिती चित्रपट व्यापार विश्लेषक रमेश बालाने इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत दिली. लायगरमध्ये विजय आणि अनन्यासोबतच रम्या कृष्णन, रोनित रॉय आणि प्रसिद्ध बॉक्सर माईक टायसन यांच्याही भूमिका आहेत. पुरी जगन्नाथ यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.