मुंबई : सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) स्टारर ‘शेर शाह’ (Sher Shah) हा चित्रपट रिलीज झाल्यापासून लोक या अभिनेत्यांसाठी वेडे झाले आहेत. विशेषतः कियाराचा लूक सर्वांनच्याच पसंतीस उतरत आहे. अभिनेत्रीचा साधा लूक इतका व्हायरल होत आहे की प्रत्येकजण तिला कॉपी करत असल्याचं दिसत आहे. दरम्यान, तिच्या चाहत्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
कियाराला केलं कॉपी
कियारा आडवाणीच्या एका छोट्या चाहतीनं सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. तिचे व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. या चिमुकलीचं नाव कियारा खन्ना आहे आणि तिनं अभिनेत्री कियाराच्या प्रत्येक स्टाईलची नक्कल केली आहे. बेबी कियाराचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत, हे व्हिडीओ पाहून प्रत्येकजण या चिमुकलीची स्तुती करण्यापासून स्वतःला रोखू शकत नाहीत. तुम्ही सुद्धा हे खास व्हिडीओ पाहाच.
पाहा खास व्हिडीओ
‘शेर शाह’ ची कथा
कियारा आणि सिद्धार्थ स्टारर ‘शेर शाह’ कारगिल युद्धातील शहीद कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित आहे. सिद्धार्थ मल्होत्रानं या चित्रपटात विक्रम बत्राची भूमिका साकारली होती. शेर शाह केवळ भारतीय लष्करातील कॅप्टन विक्रम बत्रा यांचा प्रवास दाखवत नाही तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावरही प्रकाश टाकतो. कियारा अडवाणीनं विक्रम बत्राच्या लव्ह लाईफ डिंपल चीमाची भूमिका साकारली होती. शेरशाहमध्ये तुम्हाला दिसेल की एक लहान मूलं कसं ठरवतो की तो भारतीय लष्कराचा एक भाग बनेल आणि भारतीय सैन्यात सामील झाल्यावर तो प्रत्येकाची मनं जिंकतोच पण शत्रूंना हुसकावून लावतो.
चित्रपटात काय आहे विशेष
‘शेरशाह’ तुम्हाला विक्रमच्या आयुष्यातील त्या क्षणांपर्यंत नेतो, ज्याबद्दल तुम्ही कदाचित वाचलंही नसेल किंवा पाहिलंही नसेल. सैन्यात भरती होण्यापासून ते महाविद्यालयीन जीवनातील मजा आणि कारगिल युद्धातील पॉईंट 4875 च्या विजयापर्यंत 24 वर्षांच्या पहिल्या लष्करी मोहिमेची आज्ञा देण्यापर्यंत, तुम्हाला चित्रपटातील प्रत्येक गोष्ट पाहायला मिळेल. सुमारे 2 तास 15 मिनिटे चित्रपट पाहिल्यानंतरही तुम्हाला वाटतं की चित्रपट थोडा जास्त लांब असायला हवा होता जेणेकरून आम्हाला विक्रम बत्राबद्दल अधिक माहिती मिळेल. विशु वर्धन यांचं दिग्दर्शन उत्कृष्ट होतं.
संबंधित बातम्या