The Kerala Story | मद्रास उच्च न्यायालयाचा ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाबद्दल मोठा निर्णय, निर्मात्यांना दिलासा?

| Updated on: May 04, 2023 | 9:00 PM

द केरळ स्टोरी या चित्रपटाची सध्या प्रचंड चर्चा होताना दिसत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून मोठ्या वादाला तोंड फुटले आहे. अनेकांनी या चित्रपटाच्या विरोधात थेट कोर्टात धाव देखील घेतलीये. द केरळ स्टोरी हा चित्रपट उद्या प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

The Kerala Story | मद्रास उच्च न्यायालयाचा द केरळ स्टोरी चित्रपटाबद्दल मोठा निर्णय, निर्मात्यांना दिलासा?
The Kerala Story
Follow us on

मुंबई : ‘द केरळ स्टोरी’ (The Kerala Story) हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून मोठ्या वादात सापडलाय. हा चित्रपट उद्या म्हणजेच 5 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासूनच मोठ्या वादाला तोंड फुटले. इतकेच नाही तर थेट मद्रास उच्च न्यायालयात (Madras High Court) द केरळ स्टोरी चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करणारी एक याचिका ही कोर्टात दाखल करण्यात आली. मद्रास उच्च न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावलाय. यामुळे चित्रपटाच्या निर्मात्यांना मोठा दिलासा मिळालाय. या चित्रपटाची स्टोरी ही 32 हजार मुलींवर आधारित आहे. या चित्रपटाचा ट्रेलर (Trailer) रिलीज झाल्यापासून मोठा हंगामा होताना दिसत आहे.

द केरळ स्टोरी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर सर्वांचीच झोप उडाली. अंगावर थरकाप आणणारी स्टोरी या चित्रपटाची आहे. हिंदू मुलींना फसवून त्यांचे धर्मपरिवर्तन केले जाते, असेही ट्रेलर दाखवण्यात आले आहे. विशेष म्हणजे 32 हजार मुलींची स्टोरी ही केरळमधील आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर अनेक चर्चांना देखील उधाण फुटले आहे.

चित्रपटाच्या स्थगितीची मागणी करणाऱ्या अनेक याचिकांवर सुनावणी घेण्यास मद्रास हाय कोर्टाने नकार दिला. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला उच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला होता. चित्रपट प्रदर्शित होण्यापासून रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकांपैकी एक याचिका जमियत-उलेमा-ए-हिंदचीही होती.

द केरळ स्टोरी या चित्रपटात अदा शर्मा ही मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटात अशा मुलींची स्टोरी दाखवण्यात आल्याचा दावा करण्यात आला की, त्यांची फसवणूक करत त्यांना अगोदर इस्लाम धर्म हा स्वीकारायला लावला आणि नंतर थेट दहशतवादी संघटना ISIS मध्ये सामील होण्यासाठी सीरियाला पाठवण्यात आले. या चित्रपटात अनेक मोठे दावे करण्यात आल्याचा दावा हा केला जातोय. मात्र, जशी चित्रपटाची रिलीज डेट जवळ आली तसा चित्रपटाला विरोध वाढल्याचे दिसले.

32 हजार महिला ज्या केरळमधून अचानक गायब झाल्या होत्या, हे सर्व नेमके कसे घडले हे चित्रपटामध्ये दाखवण्यात आले आहे. या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये कमालीचे क्रेझ हे बघायला मिळत आहे. या चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगू आणि मल्याळम भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे. उद्या चित्रपट रिलीज झाल्यानंतर नेमके काय हंगामे होतात हे पाहण्यासारखे ठरणार आहे. या चित्रपटाला गेल्या काही दिवसांपासून जोरदार विरोध होताना देखील दिसला.