मुंबई : मलायका अरोरा आणि अरबाज खान कायमच चर्चेत असतात. मलायका आणि अरबाज यांचा जरी घटस्फोट झाला असला तरी देखील अनेकदा मुलाला सोडण्यासाठी आणि मुलाच्या बर्थडे पार्टीत दोघेसोबत दिसतात. दोघे विभक्त झाले असूनही सोबत येत आई-वडिलांची भूमिका कायमच निभावतात. मलायका अरोरा सध्या अर्जून कपूरसोबत राहते. मलायका आणि अरबाज यांच्या मुलाचे नाव अरहान असून तो आता लवकरच बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. अरहानच्या बाॅलिवूड पदार्पणाविषयी स्वत: अरबाज खान याने खुलासा केला आहे.
एका मुलाखतीदरम्यान अरबाज खान याने सांगितले की, अरहान लवकरच बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार असून करण जोहरच्या चित्रपटात अरहान काम करणार आहे. अरहान खानसोबत करण जोहर शाहरूख खानची मुलगी सुहाना खान, अजय देवगणची मुलगी न्यासा देवगण यांनाही बाॅलिवूडमध्ये लवकरत लाॅन्च करणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून सतत करण जोहर ‘स्टारकिडस्’ला लाॅन्च करताना दिसतोय. यामुळे करण जोहरचे नाव स्टारकिडस् लाॅन्चर देखील ठेवण्यात आले आहे. अरहान खान पटना शुक्ला या चित्रपटामध्ये काम करण्यासाठी इच्छुक आहे. चंकी पांडेची लेक अनन्या पांडेलाही करण जोहरनेच लाॅन्च केले होते.
गेल्या काही दिवसांपासून बाॅक्स आॅफिसवर बाॅलिवूडचे चित्रपट काही खास कामगिरी करू शकत नाहीयेत. साऊथचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर हीट ठरत आहेत. यामुळे अनेकांनी बाॅलिवूडवर टीका करण्यास सुरूवात केलीये. बाॅलिवूडमध्ये नवीन कलाकरांना संधी न देता जुन्या कलाकारांच्या मुलांना आणि नातेवाईकांना संधी देण्यात येते, हा आरोप सातत्याने केला जातोय.