मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री नोरा फतेही सुकेश चंद्रशेखरच्या प्रकरणामुळे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. इतकेच नाहीतर नोरा हिने अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस हिच्यावर अत्यंत गंभीर आरोप देखील केले आहेत. जॅकलीन ही काहीही संबंध नसताना आपल्याला सुकेशच्या प्रकरणात अडकवत असल्याचे नोराचे म्हणणे आहे. दोन दिवसांपूर्वी नोरा हिने जॅकलीनवर मानहाणीचा दावा देखील दाखल केला. मात्र, नोरा आता थोड्या वेगळ्या कारणामुळे चर्चेत आलीये. नोरा ही मलायका अरोरा हिचा शो मूविंग इन विद मलाइका या शोमध्ये सहभागी झालीये.
मलायका हिच्या शोमध्ये आल्यावर नोरा फतेही आणि मलायका यांनी चल छैयां छैयां या गाण्यावर जबरदस्त असा डान्स केला आहे. नोरा आणि मलायका यांचा हा डान्स चाहत्यांना प्रचंड आवडल्याचे दिसत आहे.
या डान्सवेळी नोरा आणि मलायका यांनी सारखीच ड्रेसिंग देखील केलीये. दोघींचाही लूक एकदम बोल्ड दिसत आहे. हा प्रोमोचा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे.
हटके स्टाईलमध्ये नोरा आणि मलायका यांनी हा डान्स केलाय. दोघींचा हा डान्स लोकांना खूप आवडला आहे आणि आता सर्वांनाच मलायकाच्या शोच्या नव्या येणाऱ्या एपिसोडची प्रतिक्षा आहे.
मलायका गेल्या काही दिवसांपासून तिच्या या शोमुळे चर्चेत आलीये. मलायका या शोमध्ये तिच्या खासगी आयुष्याबद्दल देखील कायमच सांगते. काही दिवसांपासून या शोमध्ये करण जोहर देखील आला होता.