मलायका अरोराच्या वडिलांनी जीव दिला नाही? सर्दी, पडसंही नव्हतं… मग मृत्यूचं कारण काय?

| Updated on: Sep 11, 2024 | 5:35 PM

प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा हिच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. आज सकाळी इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून अनिल अरोरा यांनी उडी मारली. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला आहे. अरोरा यांचा मृतदेह रुग्णालयात असून पोस्टमार्टम करण्यात येणार आहे.

मलायका अरोराच्या वडिलांनी जीव दिला नाही? सर्दी, पडसंही नव्हतं... मग मृत्यूचं कारण काय?
Anil Arora
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा हिचे वडील अनिल अरोरा यांनी जीवन संपवलं आहे. आपल्या घराच्या सहाव्या मजल्यावरून त्यांनी उडी मारून जीव दिला आहे. पण पोलिसांच्या दाव्यानुसार, अरोरा यांनी आत्महत्या केली असं म्हणता येणार नाही. जर अनिल अरोरा यांनी आत्महत्या केली नाही, असं पोलिसांचं म्हणणं असेल तर मग अनिल अरोरा यांचा मृत्यू झाला कसा? असा सवाल केला जात आहे. अरोरा यांना कोणताच आजार नव्हता. साधी सर्दी किंवा पडसंही नव्हतं. जर ते आजारी नव्हते, त्यांनी आत्महत्या केली नाही, मग त्यांचा मृत्यू झाला कसा? असा सवाल केला जात आहे. अनिल अरोरा यांच्या मृत्यूचं कोडं वाढल्याने सर्वच संभ्रमात पडले आहेत.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वांद्रे येथील एका इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून अनिल अरोरा यांनी उडी मारून आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचली. अरोरा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण त्यांना मृत घोषित करण्यात आले. अरोरा यांनी आत्महत्या का केली याची माहिती मिळू शकली नाही. ते कारण अद्याप स्पष्ट झालं नसून आम्ही तपास करत आहोत.

अरोरा कुटुंबीय तणावात

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मलायका अरोराच्या वडिलांचा सकाळी मृत्यू झाला. त्यांनी आत्महत्या केली नाही. ही एक दुर्घटना असल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेमुळे अरोरा कुटुंबीय अत्यंत तणावात आलं आहे. कारण अनिल अरोरा यांना कोणताच आजार नव्हता. तरीही त्यांचा अचानक मृत्यू झाला. त्यामुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

पंचनामा सुरू

पोलिसांनी लगेच घटनास्थळाचा पंचनामा सुरू केला आहे. या प्रकरणी शेजारी आणि सोसायटीतील इतरांच्या साक्षी घेतल्या जाणार आहेत. प्रत्येक अँगलने तपास केला जाणार आहे. ही घटना घडली तेव्हा मलायकाची आई घरातच होती. त्यांचीही चौकशी केली जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

त्यानंतर नेमकं कारण कळणार

अरोरा यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. पोस्टमार्टमनंतर अरोरा यांच्या मृत्यूचं नेमकं कारण समजणार आहे. तोपर्यंत पोलीस इतर अँगलने तपास करणार असल्याचं सांगितलं जात आहे.

मलायका, अमृता मुंबईकडे रवाना

दरम्यान, वडिलांचा मृत्यू झाला तेव्हा मलायका अरोरा ही पुण्यात होती. वडिलांच्या मृत्यूची बातमी कळताच मलायका आणि अमृता अरोरा या दोन्ही बहिणी मुंबईकडे रवाना झाल्या. दुपारी दोघीही मुंबईत आल्या. यावेळी त्यांनी तोंडाला स्कार्फ बांधलेला होता. दोघींच्याही डोळ्यातून अश्रू येत होते. वडिलांच्या अचानक जाण्याचा या दोघींनाही धक्का बसल्याचं दिसत होतं.