मुंबई : गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) हिचे नाव गुरु रंधावा याच्यासोबत जोडले जात आहे. विशेष म्हणजे नुकताच तेरा की ख्याल हे गाणे मलायका आणि गुरु रंधावा यांचे रिलीज झाले आहे. या गाण्यामध्ये मलायका अरोरा ही अत्यंत बोल्ड लूकमध्ये दिसत आहे. अनेकांनी थेट अर्जुन कपूर याचा पत्ता कट झाला असून मलायका अरोरा ही गुरु रंधावा (Guru Randhawa) याला डेट करत असल्याचे थेट म्हटले. मलायका अरोरा ही कायमच तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत असते. मलायका अरोरा ही तिच्या शोमध्ये अनेक खुलासे करताना कायमच दिसते. मलायका अरोरा हिने तिच्या खासगी आयुष्याबद्दलही अनेक गोष्टी शोमध्ये सांगितल्या आहेत.
विशेष म्हणजे मलायका अरोरा ही सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी ती कायमच बोल्ड फोटो शेअर करताना दिसते. मलायका अरोरा आणि अरबाज खान हे घटस्फोट घेणार असल्याचे कळताच चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर मलायका अरोरा ही अर्जुन कपूर याला डेट करत आहे.
नुकताच मलायका अरोरा हिने एक खास मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये मलायका अरोरा हिने काही मोठे खुलासे केले आहेत. मलायका अरोरा म्हणाली की, सेक्सी बॉम्बशेल या नावाने लोक मला बोलावतात किंवा ओळखतात हे माझ्यासाठी खरोखरच खूप त्रासदायक होते. जेंव्हा तुमची ओळख ही सेक्सी बॉम्बशेलने होते, त्यावेळी कोणीही तुम्हाला फार गांभिर्याने घेत नाही. जे लोक तुम्हाला सेक्सी बॉम्बशेल म्हणतात, तेच तुमचा जास्त काळ विचार देखील करतात.
पुढे मलायका म्हणाली, सेक्सी बॉम्बशेल हे माझ्यासाठी अत्यंत त्रासदायक होते. कारण लोक फक्त चांगले शरीर आणि चांगल्या चेहऱ्याबद्दल तुमच्या विचार करतात. मला माझी ही छबी बदलायची होती. मात्र हे करण्यासाठी मला खूप जास्त मेहनत घ्यायची होती. आत्मविश्वास माझ्याकडे खूप जास्त महत्वाचा असल्याचे म्हणताना देखील मलायका अरोरा दिसली.
मलायका म्हणाली, मी आज मला स्वत: ला खूप जास्त समजदार आणि शांत समजते. पुढे मलायका अरोरा म्हणाली की, यादरम्यान मी सतत अंतर्गत कलहाचा सामना करत होते. मलायका अरोरा हिने या मुलाखतीमध्ये अजून काही धक्कादायक खुलासे देखील केले आहेत. मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे गेल्या काही दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. मध्यंतरी चर्चा सुरू होती की, मलायका अरोरा ही लवकरच अर्जुन कपूर याच्या बाळाची आई होणार आहे. मात्र, त्यानंतर अर्जुन कपूर याने खडेबोल सुनावले होते.