मुंबई : मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर गेल्या काही दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. प्यार किया तो डरना क्या म्हटल्याप्रमाणे मलायका आणि अर्जुन सोशल मीडियावर आपले प्रेम कायमच व्यक्त करतात. मलायका कधी अर्जुन कपूरसोबत लग्न करणार हा प्रश्न सातत्याने विचारला जातोय. आता यावर मलायका अरोरा थोडे स्पष्टच संकेत देताना दिसतंय. मलायकाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीये. ज्याची चर्चा आता रंगताना दिसतंय.
नुकताच मलायका अरोराने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलीये. ही पोस्ट शेअर करताना मलायकाने स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये मलायकाने सुंदर पोज दिलीये. या फोटोसोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘मी हो म्हटले’ यासोबत तिने 3 हार्ट इमोजी शेअर केले आहेत. चाहत्यांसोबतच सेलेब्सही या पोस्टवर कमेंट केल्या आहेत.
आता सोशल मीडियावर चर्चा रंगत आहे की, मलायकाने नेमक्या कोणत्या गोष्टीसाठी होकार दिलाय. एक अंदाजा लावला जातोय की, मलायकाने अर्जुन कपूरला लग्नासाठी होकार दिलाय. आता लवकरच अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा लग्नबंधणात अडकू शकतात. चाहते गेल्या अनेक वर्षांपासून मलायका आणि अर्जुन कपूरच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहात आहेत. मलायकाचा मुलगा अरहान खान लवकरच बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.