बॉलिवूडची (Bollywood) दिवा अर्थात मॉडेल आणि अभिनेत्री मलायका अरोराच्या (Malaika Arora) सौंदर्याची, फिटनेसची जगभरात चर्चा आहे. मलायका जरी चित्रपटांपासून दूर असली तरी लाइमलाइटमध्ये राहण्यासाठी ती कोणतीही कसर सोडत नाही. वयाच्या 48 व्या वर्षीही ती इतकी फिट आणि बोल्ड दिसते की ती तरुण अभिनेत्रींनाही सहज मात देऊ शकेल. मलायकाच्या जगभरातील फॅन फॉलोईंगची यादीही खूप मोठी झाली आहे, जे तिच्या एका झलकसाठी आतुर आहेत. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या मलायकाने तिच्या लेटेस्ट लूकची झलक दाखवली आहे. मलायकाने नुकताच इन्स्टाग्राम अकाऊंटवर बिकिनीतील (Bikini) तिचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोवर नेटकऱ्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय. अवघ्या पाच तासांत या फोटोला जवळपास अडीच लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत.
ॲनिमल प्रिंटेड बिकिनी परिधान करत मलायकाने हा फोटो पोस्ट केला आहे. वयाच्या 48व्या वर्षीही अत्यंत फिट दिसणाऱ्या मलायकाला पाहून नेटकरी फिदा झाले आहेत. या अंदाजात ती खूपच हॉट दिसत आहे. त्यामुळेच मलायकाचा हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून ती 48 वर्षांची आहे याचा अंदाजही लावता येत नाही.
मलायका अरोराच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाल्यास ती अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. या दोघांचं प्रेम कोणापासून लपलेलं नाही. अनेकदा दोघांनाही त्यांच्या वयातील अंतरावरून ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. पण दोघंही अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करतात आणि प्रसंगी ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देतानाही दिसतात. मलायका ही 48 वर्षांची असून अर्जुन हा 36 वर्षांचा आहे. या दोघांमध्ये 12 वर्षांचं अंतर आहे. जवळपास गेल्या चार वर्षांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत आहेत. 2019 मध्ये अर्जुनच्या वाढदिवशी मलायकाने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत नातं जगजाहीर केलं होतं. त्याआधी दोघांनीही माध्यमांपासून आपलं रिलेशनशिप लपवण्याचा प्रयत्न केला होता. आता लवकरच ही जोडी विवाहबद्ध होणार असल्याचं समजतंय.