छैय्या छैय्या गाण्याचे शूटिंग करणे मलायका अरोरा हिला पडले होते महागात, कंबरेतून रक्त आणि मोठी दुखापत

| Updated on: Mar 17, 2023 | 9:53 PM

मलायका अरोरा ही कायमच चर्चेत असते. मलायका तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते. इतकेच नाहीतर कायमच मलायका अरोरा ही तिच्या पर्सनल लाईफमुळेही चर्चेत राहते. गेल्या काही दिवसांपासून मलायका तिच्या शोमधून मोठे खुलासे करताना दिसत आहे.

छैय्या छैय्या गाण्याचे शूटिंग करणे मलायका अरोरा हिला पडले होते महागात, कंबरेतून रक्त आणि मोठी दुखापत
Follow us on

मुंबई : मलायका अरोरा कायमच चर्चेत राहते. मलायका तिच्या फिटनेसकडे प्रचंड लक्ष देते. अनेकदा जिमच्याबाहेर मलायका अरोरा स्पाॅट होते. गेल्या काही वर्षांपासून मलायका अरोरा (Malaika Arora) ही अर्जुन कपूर याला डेट करत आहे. अनेकदा हे दोघेसोबतच स्पाॅट होतात. अर्जुन कपूर याला डेट करत असल्याने अनेकदा मलायका अरोरा ही नेटकऱ्यांच्या निशाण्यावर देखील येते. काही दिवसांपूर्वी एक चर्चा रंगली होती की, अर्जुन कपूर याच्या पहिल्या बाळाची आई मलायका अरोरा होणार असून ती प्रेग्नेंट आहे. यावर अर्जुन कपूर याने संताप व्यक्त केला होता.

मलायका अरोरा ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या शोमुळे प्रचंड चर्चेत आहे. मलायका अरोरा ही तिच्या शोमध्ये तिच्या पर्सनल आयुष्याबद्दल अनेकदा खुलासे करताना दिसते. नुकताच मलायका अरोरा हिने तिचे फेमस आणि लोकांच्या आवडतीचे गाणे चल छैय्या छैय्या याबाबत मोठा खुलासा केला आहे.

मलायका अरोरा हिचे गाणे छैय्या छैय्या हे आताही कानावर पडले की, डान्स करण्याची इच्छा जवळपास सर्वांनाच होते. हे गाणे ट्रेनवर शूट करण्यात आले आहे. या गाण्यात मलायका अरोरा हिच्यासोबत शाहरूख खान हा देखील आहे. हे गाणे सुपरहिट ठरले आहे. या गाण्याला प्रेक्षकांचे उदंड असे प्रेम मिळाले आहे.

छैय्या छैय्या गाणे शूट करत असताना नेमके काय घडले हे मलायका अरोरा हिने सांगितले आहे. हे गाणे शूट करताना मलायका अरोरा ही जखमी झाली होती. इतकेच नाहीतर जखमेमुळे रक्त देखील निघत होते. हे पाहून शाहरूख खान याला खूप जास्त टेन्शन आले. यावरच आता मलायका अरोरा ही बोलली आहे.

मलायका अरोरा म्हणाली की, त्याकाळात हार्नेस नव्हते. त्यावेळी कोणत्याही सुरक्षेशिवाय गाण्याचे शूटिंग करावे लागत होते. ट्रेनवर गाणे शूट करायचे असल्याने शाहरुख खान खूप जास्त तणावात होता. कारण माझे वजन खूप कमी होते. शाहरुख खान याच्या म्हणण्यामुळे मलायका अरोरा हिने कंबरेला दोरी बांधून या गाण्याचे शूटिंग केले.

कंबरेला दोरी बांधल्यामुळे मलायकाच्या कंबरेमधून रक्त निघायला लागले. इतकेच नाहीतर यामुळे तिला मोठी जखमही झाली होती. यानंतर चित्रपटाच्या संपूर्ण टिमने मलायका अरोरा हिची काळजी घेतली. आता मलायका अरोरा हिच्या या गाण्याला तब्बल 24 वर्ष पूर्ण झाले आहेत. मलायकाचे छैय्या छैय्या हे गाणे बाॅलिवूडच्या बेस्ट गाण्यांपैकी एक आहे.