मुंबई : मलायका अरोरा ही गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. मलायका अरोरा (Malaika Arora) ही मूविंग इन विद मलायका या शोमध्ये काही मोठे खुलासे करताना दिसत आहे. आतापर्यंत मलायका अरोरा हिच्या या शोला अनेकांनी हजेरी लावलीये. काही दिवसांपूर्वी मलायकाच्या शोमध्ये करण जोहर (Karan Johar) हा पोहचला होता. यावेळी करण जोहर हा चक्क मलायका हिला तिच्या सेक्स लाईफबद्दल प्रश्न विचारताना दिसला. मात्र, यावर मलायका हिने उत्तर देणे टाळले. मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचा 2017 मध्ये घटस्फोट झालाय. गेल्या काही वर्षांपासून मलायका ही अर्जुन कपूर (Arjun Kapoor) याला डेट करत आहे.
अनेकदा मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे स्पाॅट होतात. मध्यंतरी एक चर्चा सतत रंगत होती की, अर्जुन कपूर याच्यासोबत लवकरच मलायका ही लग्न करणार आहे. मात्र, यावर कधीच अर्जुन कपूर किंवा मलायका हिने भाष्य केले नाहीये. अनेकदा हे दोघे सुट्टया घालवण्यासाठी विदेशातही फिरायला जातात.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय. विशेष म्हणजे या व्हिडीओमध्ये गीता कपूर देखील दिसत आहे. या व्हिडीओमध्ये मलायका अरोरा ही भडकलेली दिसतंय. मात्र, परिस्थिती गीता कपूर सांभाळून घेते. हा व्हायरल होणारा व्हिडीओ मुंबईमधील असून एका पार्टीच्यावेळीचा आहे.
व्हिडीओमध्ये मलायका अरोरा, गीता कपूर आणि अजून काही लोक दिसत आहेत. टेरेंस लुईस याच्या पार्टीमध्ये मलायका अरोरा पोहचली होती. पार्टीच्या ठिकाणी पोहचल्यावर मलायका अरोरा वेन्यूमध्ये जाण्याच्या पूर्वी काहीतरी विचारत होती. एका व्यक्तीच्या हाताचा धक्का मलायका अरोरा हिच्या हाताला लागतो.
व्हिडीओमध्ये दिसत आहे की, दुसऱ्या व्यक्तीचा हात मलायका अरोरा हिच्या हाताला लागतो आणि तेवढ्यात मलायकाच्या हातामधील मोबाईल पडतो…हे पाहून मलायका अरोरा चिडते. मात्र, यावेळी गीता कपूर ही परिस्थिती सांभाळून घेते आणि तिथून मलायका अरोरा निघून जाते. म्हणजे टेरेंस लुईस याच्या पार्टीमध्ये मलायका अरोरा हिचे नुकसान झाले.
आता हा व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय. मुळात म्हणजे मलायका अरोरा ही अत्यंत महागडे फोन वापरते. मलायका हिच्याकडे असलेल्या या फोनची किंमत लाखोंच्या घरात असल्याचे सांगितले जातंय. अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट करण्यासही सुरूवात केलीये. मलायका अरोरा कायमच तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत असते.