मुंबई : मंदिरा बेदी (Mandira Bedi) यांचे पती राज कौशल (Raj Kaushal) यांचं नुकतंच निधन झालं आहे, त्यानंतर मंदिरा कोणत्या ना कोणत्या कारणानं चर्चेत असते. कधी ती आपल्या पतीच्या आठवणीत पोस्ट शेअर करत असते तर कधी ती आपल्या कुटूंबियांसह फोटो शेअर करते. मंदिरा बेदीची मुलगी तारा आज पाच वर्षांची झाली आहे आणि यानिमित्तानं मंदिरानं खास पोस्ट शेअर करत मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मंदिरानं तिच्याबद्दल सुंदर संदेश लिहिला असून, तिनं मुलगी ताराबरोबर स्वत: आणि कुटुंबियांचे काही फोटो शेअर केले आहेत.
5 वर्षांची झाली तारा
मंदिरा बेदीने तारासोबत तिचे काही सुंदर फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिचा दिवंगत पती राज कौशल आणि मुलगा वीर देखील दिसत आहेत. हे शेअर करत तिनं आपल्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “28 जुलै! तू आमच्या आयुष्यात येण्याला 1 वर्ष झालं आहे. गोड गोड तारा … आणि म्हणूनच आज आम्ही तुझा वाढदिवस साजरा करत आहोत. हा तुझा 5 वा वाढदिवस आहे, माझ्या बाळा. मी तुझ्यावर खूप प्रेम करते”. यासह मंदिरा बेदीनं पोस्टमध्ये इमोजी शेअर केले आहेत.
पाहा पोस्ट
तारा मंदिरा बेदी मुलीची दत्तक घेतलेली मुलगी
तारा बेदी ही मंदिरा बेदी आणि राज कौशल यांची दत्तक घेतलेली मुलगी आहे. मागील वर्षी या जोडप्यानं ताराला दत्तक घेतलं होतं, महत्त्वाचं म्हणजे तिला भाऊ वीरनंही उघडपणे स्वीकारलं आहे. ताराला दत्तक घेतल्यानंतर मंदिरा बेदीनं एक सुंदर व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ पाहून चाहत्यांना खूप आनंद झाला होता आणि अनेकदा मंदिरा तारासोबत फोटो शेअर करतानाही दिसते. पोस्टद्वारे मंदिरानं ज्या प्रकारे आपल्या मुलीवरील प्रेम व्यक्त केले आहे, ते तिच्या चाहत्यांनाही खूप आवडलं आहे. (Mandira Bedi celebrates daughter’s 5th birthday, shared pictures with Tara and Raj)
संबंधित बातम्या
Indian Idol 12 : ‘इंडियन आयडल 12’ स्क्रिप्टेड म्हणणाऱ्यांना आदित्य नारायणनं फटकारलं, म्हणाला…