मुंबई : बाॅलिवूड अभिनेते मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee) हे कायम चर्चेत असतात. गेल्या काही दिवसांपूर्वीच त्यांचा गुलमोहर हा चित्रपट रिलीज झालाय. मनोज बाजपेयी त्यांच्या बिनधास्त वक्तव्यांसाठी ओळखले जातात. काही दिवसांपूर्वीच मनोज बाजपेयी यांनी नेपोटिझमवर मोठे भाष्य करत सर्वांना धक्का दिला होता. नेपोटिझमवर बोलताना मनोज बाजपेयी हे म्हणाले की, नेपोटिझम भारतीय चित्रपट (Movie) उद्योगातील एक निरर्थक वाद आहे. मनोज बाजपेयी यांनी थेट नेपोटिझमचा विषयच निरुपयोगी असल्याचे म्हटले होते. मात्र, यानंतर मनोज बाजपेयी यांच्यावर जोरदार टिका देखील करण्यात आली.
गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूड क्षेत्रामध्ये नेपोटिझमचा विषय गाजताना दिसतोय. यामुळेच बाॅलिवूडच्या चित्रपटांवर बहिष्कार देखील टाकला जातोय. नेपोटिझममुळे इतरांना संधी चित्रपटामध्ये काम करण्याची मिळत नसल्याचा आरोप सातत्याने केला जातोय. मात्र, नेपोटिझमचे समर्थन केल्याने मनोज बाजपेयीवर टिका करण्यात आली होती.
गेल्या वर्षी मनोज बाजपेयी यांनी सपने में मिलती है या गाण्याच्या रिमेकमध्ये महत्वाची भूमिका केली होती. हे गाणे यूट्यूबवर झाले होते. यावरच काही धक्कादायक खुलासे करताना मनोज बाजपेयी दिसले आहेत. नुकताच मनोज बाजपेयीने एक मुलाखत दिलीये, ज्यामुळे ते चर्चेत आहेत.
मनोज बाजपेयी म्हणाले की, रिमेक व्हिडिओ तयार करत असताना मला अनेकदा राम गोपाल वर्मा यांनी शिवीगाळ केला. मनोज बाजपेयीचे हे बोलणे ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसलाय. मनोज बाजपेयीला चित्रपटामध्ये काम करण्याची संधी राम गोपाल वर्मा यांनीच दिली होती. विशेष म्हणजे यांच्यामध्ये खास मैत्री देखील आहे.
मनोज बाजपेयी पुढे म्हणाले, कधी कधी राम गोपाल वर्मा हे शिव्या देण्यासाठी फोन करतात आणि मग थोड्यावेळाने हसतात. राम गोपाल वर्मा मला फोन करून म्हणाले की, गाण्याचा रिमेक अजिबात चांगला झाला नाहीये…मी त्यांना म्हणालो की, रामू कधी कधी काही गोष्टी या आपल्या मित्रांच्या प्रेमामुळे कराव्या लागतात.
पुढे राम गोपाल वर्मा हे मनोज बाजपेयीला म्हणाले की, मला हे माहिती आहे, पण तरीही तू हे का केले? मनोज बाजपेयी म्हणाले, मला जास्त करून त्यांचे फोन रागवण्यासाठीच येतात. त्यानंतर माझी तारीफ केली जाते. अशाप्रकारेच माझे आणि राम गोपाल वर्मा यांचे रिलेशन आहे. मनोज बाजपेयी यांच्या गुलमोहर चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.