मुंबई : बॉलिवूडमध्ये अनेक प्रयोग झाले. वेगवगळे अॅक्शन, फॅमिली ड्रामा सारखे वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट आपण पाहिले. पण बॉलिवूडमध्ये याआधी न पाहिलेलं असा काहितरी चित्रपट आपल्याला बघायला मिळण्याची शक्यता आहे. कदाचित हा चित्रपट बाहुबली सारखा प्रेक्षकांचा आवडता देखील ठरु शकतो. कारण या चित्रपटात पहिल्यांदाच हॉलिवूड अभिनेता आणि जगविख्यात बॉक्सर माईक टायसन बॉलिवूड चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचं ‘लायगर’ असं नाव आहे. विशेष म्हणजे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतला स्टार अभिनेता विजय देवरकोंडा या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे. तर चंकी पांडेची मुलगी अभिनेत्री अनन्या पांडे देखील प्रेक्षकांना या चित्रपटात बघायला मिळणार आहे.
‘लायगर’ चित्रपट खरंतर अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. अनेकांना या चित्रपटाबद्दल उत्सुकता आहे. काही दिवसांपूर्वी लॉकडाऊन उघडल्यानंतर या चित्रपटाची शूटिंग पुन्हा सुरु झाली होती. आता तर या चित्रपटाशी संबंधित एक व्हिडीओ चित्रपट निर्माता करण जोहरने शेअर केला आहे. हा व्हिडीओ टिझर सारखा आहे. या व्हिडीओद्वारे माईक टायसनचं स्वागत करण्यात आलं आहे.
For the first time ever, the king of the ring will be seen on the big screens of Indian cinema! Welcoming @MikeTyson to the #LIGER team!? #NamasteTyson@TheDeverakonda @ananyapandayy #PuriJagannadh @charmmeofficial @apoorvamehta18 @RonitBoseRoy @meramyakrishnan @iamVishuReddy pic.twitter.com/pl5AnUSB35
— Karan Johar (@karanjohar) September 27, 2021
माईक टायसनचं नाव जगातील सर्वात महान बॉक्सरमध्ये घेतलं जातं. ते 1985 ते 2005 पर्यंत बॉक्सिंग क्षेत्रात कार्यरत होते. या दरम्यान माईकवर 1992 साली बलात्काराचे आरोप झाले होते. ते आरोप सिद्ध झाल्यानंतर त्याला 6 वर्ष कारवासाची शिक्षा झाली होती. त्यानंतर माईक 1995 मध्ये जेलमधून बाहेर पडला होता. बॉक्सिंग पाठोपाठ तो अभिनय क्षेत्रातही कार्यरत झाला. तो 2009 मध्ये आलेल्या ‘हँगओव्हर’ या हॉलिवूड चित्रपटात दिसला होता. त्यानंतर तो 2011 मध्ये ‘हँगओव्हर 2’ मध्ये दिसेल. याव्यतिरिक्त तो हाँगकाँगच्या प्रसिद्ध मार्शल आर्ट फिल्म सीरिज ‘IP Man 3’मध्ये दिसला होता.
#MikeTyson in Sunny Deol, Shahid Kapoor and Vivek Oberoi starrer #FoolNFinal (2007). pic.twitter.com/1G1Uk1BLrb
— CinemaRare (@CinemaRareIN) September 27, 2021
दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा या चित्रपटात एक बॉक्सरची भूमिका साकारणार आहे. त्यामुळे माईक टायसन हा या चित्रपटात विजय देवरकोंडाच्या विरोधात बॉक्सिंगच्या रिंगमध्ये उतरण्याची शक्यता असल्याचा अंदाज बांधला जातोय. या चित्रपटातून माईक टायसन बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचं बोललं जातंय. पण टायसन याआधीच 2007 साली ‘फुड अँड फायनल’ चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात सनी देओल, शाहिद कपूर, विवेक ओबेरॉय आणि आयशा टाकिया दिसले होते. या चित्रटावेळी टायसन फक्त प्रोमोजमध्ये दिसला होता. त्याला चित्रपटात गेस्ट अपियपरेंसचं क्रेडिट देण्यात आलं होतं.
‘लायगर’ या चित्रपटाचं सुरवातीला ‘फायटर’ असं नाव असल्याची चर्चा होती. पण नंतर लॉयन आणि टायगर या नावाचं मिश्रण करुन ‘लायगर’ हे नाव ठेवण्यात आलं होतं. जानेवारी 2021 मध्ये पहिल्यांदा या चित्रपटाचा फर्स्ट लूक लॉन्च करण्यात आला होता. या फोटोत विजय हातात ग्लोव्ज घालून फायटिंगच्या मोडमध्ये दिसला होता. ‘साला क्रॉसब्रीड’, अशी टॅगलाईन या फोटोमध्ये होती. ‘लायगर’ चित्रपट हिंदीसह तेलगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळी भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. पण अद्याप हा चित्रपट कधी रिलीज होणार त्याची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.
करन जोहर या चित्रपटाचा निर्माता आहे. तर पुरी जगन्नात हे दिग्दर्शन करणार आहेत. पुरी हे प्रसिद्ध तेलगू चित्रपट दिग्दर्शक आहेत. त्यांनी याआधी ‘पोक्किरी’, ‘गोलीमार’, ‘टेंपर’ सारखे प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शीत केले आहेत. 2004 साली त्यांनी पहिल्यांदा बॉलिवूड चित्रपट दिग्दर्शित केला होता. त्या चित्रपटाचं ‘शर्त-दी चॅलेंज’ असं नाव होतं. या चित्रपटात तुषार कपूर मुख्य भूमिकेत दिसला होता. या चित्रपटानंतर पुरी यांनी महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘बुड्डा होगा तेरा बाप’ हा चित्रपट बनवला होता.
हेही वाचा :
विक्की कौशल स्टारर ‘सरदार उधम सिंह’ चा टीझर रिलीज, विकी कौशल दिसला जबरदस्त लूकमध्ये