मुंबई : ‘फ्लाईंग शीख’ अर्थात लोकप्रिय धावपटू मिल्खा सिंह (Milkha Singh) यांची कोरोनाशी झुंज अयशस्वी ठरली. अनेक दिवसांपासून कोरोनाशी दोन हात करणाऱ्या मिल्खा सिंह यांचे शुक्रवारी (18 जून) निधन झाले आहे. 20 मे रोजी मिल्खा सिंह यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे आढळले होते आणि शुक्रवारी 18 जून रोजी त्यांचे निधन झाले आहे. ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यामुळे 3 जून रोजी मिल्खा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते (Milkha Singh Passes Away Bollywood celebrities pay tribute to legend on social media).
पत्नीच्या मृत्यूच्या अवघ्या 5 दिवसानंतर आता मिल्खा सिंह यांनीही या जगाचा निरोप घेतला आहे. स्वत: रूग्णालयात दाखल असल्यामुळे, मिल्खा यांना पत्नीचे अंत्य संस्कारदेखील करता आले नाहीत.
मिल्खा सिंह यांच्या जाण्यानंतर बॉलिवूड सेलिब्रिटींनाही मोठा धक्का बसला आहे. प्रियंका चोप्रा, शाहरुख खान, रवीना टंडन, तापसी पन्नू यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी मिल्खा गेल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
Warm and welcoming, you made our first meeting so so special. I have been inspired by your excellence, touched by your humility, influenced by your contribution to our country. Om Shanti #Milkha ji. Sending love and prayers to the family. #MilkhaSingh
— PRIYANKA (@priyankachopra) June 18, 2021
The Flying Sikh may no longer be with us in person but his presence will always be felt and his legacy will remain unmatched… An inspiration to me… an inspiration to millions. Rest in Peace Milkha Singh sir.
— Shah Rukh Khan (@iamsrk) June 18, 2021
And he flew away ?
— taapsee pannu (@taapsee) June 18, 2021
Had the honour of meeting you Sir, you will always have a special place in all our hearts ! Whenever we need to be inspired, “bhaag milkhe bhaag,” will resound in our ears ! Om Shanti. ?? https://t.co/UZC6chEQg8
— Raveena Tandon (@TandonRaveena) June 18, 2021
RIP #MilkhaSingh.
An inspirational life. A national treasure…?
Heartfelt condolences to the family.?— Adnan Sami (@AdnanSamiLive) June 18, 2021
‘भाग मिल्खा भाग’ हा चित्रपट मिल्खा सिंह यांच्या जीवनावर तयार करण्यात आला आहे. या चित्रपटात फरहान अख्तरने मिल्खा सिंह यांची भूमिका साकारली होती. या चित्रपटात फरहानशिवाय सोनम कपूर देखील मुख्य भूमिकेत होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता.
या चित्रपटासाठी मिल्खा यांनी 1 रुपयांची नोट घेतली होती. ती नोट खूप खास होती कारण, ती 1958 मध्ये छापली गेली होती. खरं तर, त्याच वर्षी मिल्खा यांनी राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते.
(Milkha Singh Passes Away Bollywood celebrities pay tribute to legend on social media)
‘आम्ही एका महान खेळाडूला गमावून बसलो’, मिल्खा सिंग यांच्या निधनानंतर पंतप्रधान मोदी भावूक
Milkha Singh: ‘फ्लाईंग सिख’ मिल्खा सिंग यांचं निधन, कोरोनाविरुद्धची झुंज अपयशी