मुंबई : अमेझॉन प्राईम व्हिडीओ’नं आज वर्षातील बहुप्रतीक्षित समर ब्लॉकबस्टर, ‘तुफान’ (Toofaan) चित्रपटाचं ट्रेलर रिलीज केलं आहे. अमेझॉन प्राईम व्हिडीओच्या सहकार्यानं एक्सेल एन्टरटेनमेंट प्रस्तुत, रितेश सिधवानी, फरहान अख्तर आणि राकेश ओमप्रकाश मेहरा निर्मित तुफान प्रेरणादायक खेळ-कथा उलगडणार आहे. या सिनेमात दिग्गज कलाकारांचा सहभाग असून मुख्य भूमिकेत फरहान अख्तर असणार आहे. त्याच्यासोबत मृणाल ठाकूर, परेश रावल, सुप्रिया पाठक कपूर, हुसेन दलाल, डॉ. मोहन आगाशे, दर्शन कुमार आणि विजय राझ झळकणार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी केले आहे.
स्थानिक गुंडाच्या जीवनप्रवासाचे दर्शन
‘तुफान’च्या धडाकेबाज ट्रेलरमध्ये स्थानिक गुंडाच्या जीवनप्रवासाचे दर्शन घडतं. हा अज्जू भाई व्यावसायिक बॉक्सर अझीझ अली बनतो. तुफान’चं कथानक आशा, आस्था आणि अंतर्गत ऊर्जा, जी पुढे जाऊन जिद्द आणि चिकाटीत परावर्तित होते. एकाच वेळी हिंदी आणि इंग्रजीत अमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रकाशित होणारा तुफान हा पहिलाच चित्रपट असून 16 जुलै 2021 पासून भारतासह 240 देश आणि प्रदेशातील प्राईम मेंबर्ससाठी तो उपलब्ध असेल.
पाहा ट्रेलर
मुख्य व्यक्तिरेखेचा अभ्यास करणं ती भूमिका जगणं हा अनुभव किती आव्हानात्मक होता हे यावेळी फरहान अख्तरनं सांगितलं. आपल्या वाट्याला आलेली भूमिका आणि तिच्या तयारीविषयी बोलताना तो म्हणाला की, “मी तुफानच्या खऱ्या अर्थाने प्रेमात आहे. एखादी व्यक्ती शरीरानं कितीही बळकट असली तरीही बॉक्सर असणं, हे काही येरागबाळ्याचे काम नाही. या व्यक्तिरेखेच्या भूमिकेत शिरताना मला 8 ते 9 महिने कष्ट घ्यावे लागले. बॉक्सिंग हा खेळ शारीरिक, मानसिक आणि भावनिकदृष्ट्या तुमची कसोटी पाहणारा खेळ आहे. आम्ही घेतलेली मेहनत स्क्रीनवर पाहण्यासाठी मी फार उत्सुक आहे. आम्ही हा चित्रपट अमेझॉन प्राईम व्हिडीओसोबत सुमारे 240 देश आणि प्रदेशात घेऊन जात असल्याचा मला आनंद वाटतो.”
काय आहे चित्रपटाची कथा
दबावाच्या परिस्थितीत डोंगरीच्या रस्त्यावर एका अनाथ मुलाचा जन्म होतो. मोठेपणी हा स्थानिक गुंड बनतो. त्याची ओळख हुशार आणि प्रेमळ तरुणी, अनन्यासोबत होते आणि त्याचं जीवनच बदलून जातं. ती त्याला योग्य मार्ग दाखवते. प्रेम आणि मार्गदर्शनाच्या जोरावर हा तरुण आपलं नशीब आजमावतो. एक जागतिक किर्तीचा बॉक्सर म्हणून त्याला लौकिक मिळतं. ही एक प्रेरणादायी कथा आहे. गरिबी आणि मागास परिस्थितीत पिचलेला नायक देशाचा आदर्श होतो. तो वाईट मार्ग सोडतो आणि योग्य दिशा अंगीकारतो. तुफानची कथा मुंबईत आकार घेते. नायक आणि नायिकेनंतर मुंबई शहर या कथानकाची तिसरी व्यक्तिरेखा आहे. मुंबईला स्वत:चा बाज आहे, ते भारतातील बड्या शहरांपैकी एक आहे. या शहरात सर्व जाती-धर्म एक होऊन नांदतात. त्यामुळे विविध संस्कृती आणि धर्माचा हा मेल्टिंग पॉट मानला जातो. मुंबईची ही ‘शान’ नक्कीच अभिमानास्पद आहे. आपल्या व्यक्तिरेखा सिनेमांच्या आधारे मुंबईचे दर्शन घडवताना दिसतील.
संबंधित बातम्या
Photo : प्रचंड सुंदर आहे यामी गौतमची धाकटी बहीण, पाहा सुरीलीचे खास फोटो
Photo : अभिनयाने सुरुवात, चित्रपट दिग्दर्शनही, मंदिरा बेदीचे पती राज कौशल यांची फिल्मी कारकीर्द