मुंबई : बॉलिवूडची ‘पंगा गर्ल’ कंगना रनौतने आपल्या नवीन वर्षाची सुरुवात राहू-केतू मंदिरात पूजा करून केली. या मंदिरातील पूजेनंतर अभिनेत्रीने असेही सांगितले होते की, तिला यावर्षी कमी पोलिस तक्रारी/एफआयआर आणि अधिक प्रेमपत्रे हवी आहेत. अशा स्थितीत अभिनेत्रीची पूजा आता फळत असल्याचे दिसत आहे. कंगना रनौतविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याची जावेद अख्तर यांची मागणी मुंबईतील स्थानिक न्यायालयाने फेटाळली आहे.
लेखक-निर्माते जावेद अख्तर यांनी अभिनेत्री कंगना रनौतविरुद्ध मानहानीच्या प्रकरणात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. जावेद अख्तर यांचे वकील जय भारद्वाज यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची पुढील सुनावणी 1 फेब्रुवारी रोजी अंधेरी महानगर दंडाधिकारी येथे होणार आहे. जावेद अख्तर यांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कोर्टात ही याचिका दाखल केली होती.
या संदर्भात जावेद अख्तर म्हणाले होते की, कंगना कोणत्या ना कोणत्या बहाण्याने कोर्टात हजर होत नाही. मात्र या काळात ती सतत सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होत असते. जावेद यांच्या या अर्जावर न्यायालयाने कंगनाच्या वकिलाला पुढील सुनावणीच्या तारखेला म्हणजेच 4 जानेवारी रोजी उत्तर दाखल करण्यास सांगितले होते. या प्रकरणी अभिनेत्री अखेरची 20 सप्टेंबर रोजी अंधेरी मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट आरआर खान यांच्यासमोर हजर झाली होती.
यापूर्वी याच प्रकरणात मुख्य मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटने तिचा मानहानीचा खटला हस्तांतरित करण्याची कंगनाची याचिका फेटाळून लावली होती. तसेच, जावेदच्या तक्रारीनंतर मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टानेही अभिनेत्रीविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी केले होते. यानंतर कंगनाने कोर्टात धाव घेतली. जामीन आणि जामीन रक्कम भरल्यानंतर तिच्व वॉरंट रद्द करण्यात आले.
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने गेल्या वर्षी एका टीव्ही मुलाखतीदरम्यान सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी जावेद अख्तर यांच्यावर निशाणा साधला होता. जावेद अख्तर चित्रपटसृष्टीत दुफळी निर्माण करतात आणि घराणेशाहीला प्रोत्साहन देतात, असे ती म्हणाले होती. अभिनेत्रीच्या या वक्तव्यानंतर जावेद अख्तर यांनी कंगनावर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करत, आपली प्रतिमा डागाळल्याचा आरोप केला होता.
जावेद अख्तर यांनी 2 नोव्हेंबर 2020 रोजी त्यांचे वकील निरंजन मुंदरगी यांच्यामार्फत खाजगी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत त्यांनी कंगनावर आयपीसीच्या कलम 499 (मानहानी) आणि कलम 500 (बदनामीची शिक्षा) अंतर्गत आरोप लावले होते.
कुणाची अंगठी तर कुणासाठी ब्रेसलेट, जाणून घ्या तुमच्या सुपरस्टार्सचा लकी चार्म कोणता?
नृत्यांगना ते अभिनेत्री…‘पिंकीचा विजय असो’ मालिकेतील ‘पिंकी’ने हेमा मालिनींसोबतही केलंय काम!