मुंबई : प्रतीक गांधी यांची स्कॅम 1992 ही वेब सीरिज प्रेक्षकांना खूप आवडली. हर्षद मेहताची स्टोरी या बेव सीरिजमध्ये दाखवण्यात आली होती. प्रेक्षकांना ही वेब सीरीज इतकी आवडली होती की, IMDB ने भारतातील पहिल्या 10 वेब सीरीजच्या यादीमध्ये या वेब सीरिजचा समावेश केला होता. (Mumbai High Court stays FIR against Sony Pictures)
अलीकडेच एका बँकेने 1992 या वेब सीरिजमधून त्यांची बदनामी केल्याचा आरोप केला आहे. सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडियाविरोधात पुण्यात एफआयआर दाखल करण्यात आली होती. ज्यात वेब सीरिजमधून बँकेला बदनाम केल्याचा आरोप करण्यात आला होता. मुंबई उच्च न्यायालयाने आज या एफआयआरमधील तपासाला स्थगिती दिली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली
कराड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेने दाखल केलेल्या एफआयआरच्या तपासाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. एफआयआर दाखल झाल्यानंतर सोनी पिक्चर्सने न्यायालयात धाव घेतली आणि एफआयआर रद्द करण्याची मागणी केली. या मागणीवर, न्यायमूर्ती एस एस शिंदे आणि न्यायमूर्ती एनजे जमादार यांच्या खंडपीठाने एफआयआर रद्द करण्याच्या याचिकेवर 17 सप्टेंबरपर्यंत अंतरिम दिलासा दिला आहे.
4 जुलै 2021 रोजी सोनी पिक्चर्सविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली. विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. एफआयआरमध्ये बँकेने म्हटले आहे की, वेब सीरिजच्या तिसऱ्या भागात, एक लोगो दाखवण्यात आला आहे. जो बँकेच्या ट्रेडमार्कसारखा दिसतो. या लोगोमुळे बँकेचे खूप नुकसान होत आहे.
संबंधित बातम्या :
Thalaivii : कंगना रनौतच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, ‘या’ तारखेला रिलीज होणार ‘थलायवी’
रामू जेव्हा जॅकीच्या भूमिकेत शिरतो तेव्हा ‘रंगिला’ बनतो, खासगी व्हिडीओ वेगानं व्हायरल
(Mumbai High Court stays FIR against Sony Pictures)