मुंबई : मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये न्यूमोनियावर उपचार घेत असलेले अभिनेते नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) यांची तब्येत सुधारत आहे. न्यूमोनियाच्या त्रासानंतर त्यांना 29 जूनला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांकडून परवानगी मिळाल्यानंतर त्यांच्या सचिवांनी ही माहिती माध्यमांना दिली होती (Naseeruddin Shah Health Update Improving health will soon be discharged from the hospital).
नसीरुद्दीन शाह यांची पत्नी रत्ना पाठक-शाह यांनी काल नसीरुद्दीन शाह यांच्या फुफ्फुसात न्युमोनियाचा एक छोटासा पॅच आढळल्याची माहिती देऊन सर्वांना चकित केले होते. त्यानंतर तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. वेळेवर योग्य उपचार केल्याने त्यांचा न्यूमोनिया त्वरित नियंत्रणात आणला गेला.
नसीरुद्दीन शाह हा देशातील सर्वात मोठा सुपरस्टार आहे. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून पदवी घेतल्यानंतर 46 वर्षांपूर्वी त्याने बॉलिवूडमध्ये आपल्या कारकिर्दीची सुरूवात केली होती. नसीरुद्दीन शाह यांना समांतर सिनेमाचा राजा मानले जाते. ‘निशांत’, ‘जाने भी दो यारो’, ‘इजजात’, ‘मासूम’ आणि ‘मिर्च मसाला’ या चित्रपटांमधून त्यांनी आपल्या अभिनयाने सर्वांचे मनोरंजन केले. नंतर जेव्हा ते व्यावसायिक चित्रपटांकडे वळले तेव्हा ‘मोहरा’, ‘सरफरोश’, ‘इश्किया’, ‘डर्टी पिक्चर’ आणि ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ यासारख्या चित्रपटांमध्येही त्यांनी धमाकेदार भूमिका केल्या आहेत.
अभिनेता होण्याव्यतिरिक्त नसीरुद्दीन शाह एक दिग्दर्शक देखील आहेत. त्यांनी ‘यूं क्या होता है’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. कोंकणा सेन शर्मा, इरफान खान, आयशा टाकिया, जिमी शेरगिल, रत्ना पाठक-शाह आणि परेश रावल या दिग्गज कलाकारांनी या चित्रपटात काम केले आहे. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवू शकला नाही.
नसीरुद्दीन शाह यांना गेल्या वर्षी वेब सीरीज ‘बंदिश बॅन्डिट्स’ या सिनेमाद्वारे डिजिटल विश्वात डेब्यू केला होता. त्यांना उत्कृष्ट अभिनयासाठी आतापर्यंत तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून फिल्मफेअर पुरस्काराने तीनदा सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना 1987मध्ये पद्मश्री आणि 2003मध्ये पद्मभूषण पुरस्कारानेही गौरवण्यात आले आहे.
गेल्या वर्षीही नसीरुद्दीन शाह यांची तब्येत बिघडल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या, पण त्यानंतर त्यांच्या मुलाने हे अहवाल चुकीचे असल्याचे सांगितले होते. इरफान खान आणि ऋषी कपूर यांच्या निधनानंतर या चर्चा खूप व्हायरल झाल्या होती. यानंतर त्यांचा मुलगा विवान याने ट्विट केले होते की, ‘सर्व काही ठीक आहे. त्यांच्या तब्येतीबद्दल ज्या काही बातमी येत आहेत, त्या एकदम चुकीच्या आहेत. ते एकदम ठीक आहेत.
(Naseeruddin Shah Health Update Improving health will soon be discharged from the hospital)
Dilip Kumar | श्वास घेण्यात त्रास, ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार हिंदुजा रुग्णालयात दाखल
प्रख्यात अभिनेत्री Mandira Bedi चे पती राज कौशल यांचे निधन, हार्ट अटॅकनंतर अखेरचा श्वास