मुंबई : नवरात्रोत्सवाचा (Navratra 2021) आजपासून प्रारंभ झाला आहे. आई जगदंबेचं आगमन झालं आहे आणि संपूर्ण देश हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करणार आहे. नवरात्रीमध्ये प्रत्येकजण आपले टेन्शन विसरतो आणि दांडिया आणि गरब्याच्या मस्तीमध्ये नाचू लागतो. मात्र, सध्या कोरोना महामारीमुळे सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली असली तरी हळूहळू आयुष्य पुन्हा रुळावर येत आहे आणि प्रत्येकजण पूर्वीप्रमाणे सण साजरा करत आहे.
नवरात्रीमध्ये गाणी ऐकल्यावर सगळ्यांचेच पाय थिरकू लागतात. नवरात्रीच्या गाण्यांचे ठोके ऐकून तुम्ही नाचण्यापासून स्वतःला रोखू शकत नाही. आज, या शुभ दिवशी, आम्ही तुम्हाला काही बॉलिवूड गाण्यांबद्दल सांगू, ज्याशिवाय तुमची नवरात्री प्लेलिस्ट अपूर्ण असू शकते…
तापसी पन्नूचा ‘रश्मी रॉकेट’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्याचे नवरात्री स्पेशल गाणे चित्रपटाच्या रिलीजपूर्वी रिलीज करण्यात आले आहे. या गाण्याचे नाव आहे ‘घनी कूल छोरी’. या गाण्यात तापसी गरबा करताना दिसत आहे. हे गाणे ऐकल्यानंतर तुम्ही नाचण्यापासून स्वतःला रोखू शकणार नाही.
अजय देवगणचा ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ काही काळापूर्वी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे गाणे रामो-रामो तुमची नवरात्री विशेष बनवेल. सोनाक्षी सिन्हाने या गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे.
नवरात्री सुरू होण्याआधीच या उत्सवावर गाणी तयार होऊ लागतात. गायिका ध्वनी भानुशालीचे ‘मेहंदी’ हे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. या गाण्यात ध्वनी गरबा आणि दांडिया करताना दिसत आहे. हे गाणे तुमच्या नवरात्रीच्या प्लेलिस्टसाठी योग्य आहे.
‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटातील या गाण्याशिवाय गरबा नाईट पूर्णपणे अपूर्ण आहे. हे सर्वात प्रसिद्ध गरबा गाणे आहे.
आयुष शर्माच्या पहिला चित्रपट ‘लवयात्री’मध्ये अनेक गरबा आणि दांडिया गाणी आहेत, जी तुम्ही तुमच्या प्लेलिस्टमध्ये जोडू शकता.
आयुष्मान खुरानाच्या ‘ड्रीम गर्ल’ चित्रपटातील राधे-राधे तुमच्या नवरात्रीच्या प्लेलिस्टमध्ये एक परिपूर्ण गाणे बनू शकते. जर तुम्ही या गाण्यावर दांडिया करू शकता, तर ते तुमच्या यादीत समाविष्ट करायला विसरू नका.
Akkalkot | घटस्थापनेच्या मुहुर्तावर भाविकांना स्वामी समर्थांच्या दर्शनाचा मार्ग मोकळा – tv9#MaharashtraUnlock #TempleReopen #Navratri #CoronaGuidelines pic.twitter.com/YkI036sPXN
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 7, 2021