मुंबई : अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा (Navya Naveli Nanda) ही बाॅलिवूड चित्रपटांपासून दूर आहे. मात्र, असे असताना ती चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी काैन बनेगा करोडपतीमध्ये आई श्वेता बच्चन हिच्यासोबत नव्या नंदा ही सहभागी झाली होती. यावेळी आजोबा अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यासोबत नेमके कसे नाते आहे हे सांगताना नव्या नंदा दिसली. यावेळी नव्या नंदा हिने अमिताभ बच्चन यांचे अनेक राज सांगून टाकले. नव्या नंदा ही अमिताभ बच्चन यांची लाडकी आहे. विशेष म्हणजे नव्या नंदा हिची सोशल मीडियावरही जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. नव्या नंदा हिचा भाऊ अगस्त्य नंदा हा लवकरच बाॅलिवूड चित्रपटांमध्ये (Bollywood movie) पदार्पण करणार आहे.
झोया अख्तर हिच्या आर्चीस या चित्रपटातून अगस्त्य नंदा हा बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. विशेष म्हणजे झोया अख्तर हिच्या चित्रपटामधून फक्त अगस्त्य नंदा हाच नाहीतर शाहरूख खान याची लेक सुहाना खान आणि बोनी कपूरची लेक खुशी कपूर हे बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत.
गेल्या काही दिवसांपूर्वी नव्या नंदा ही तिच्या चॅट शोमुळे चर्चेत आली होती. नुकताच अमिताभ बच्चन यांची लेक श्वेता बच्चन हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीये. या पोस्टमधील फोटोमध्ये अमिताभ बच्चन आणि नव्या नंदा दिसत आहे. श्वेता बच्चन हिने ही पोस्ट शेअर करताना खास कॅप्शन देखील दिले आहे.
नुकताच नव्या नंदा हिने आजोबा अमिताभ बच्चन यांच्यासोबत एक जाहिरात केली आहे. याच जाहिरातीचा फोटो श्वेता बच्चन हिने शेअर केला आहे. श्वेता बच्चन हिने शेअर केलेल्या जाहिरातीच्या होर्डिंगमध्ये नव्या हसताना दिसत आहे. श्वेता बच्चन हिने कॅप्शनमध्ये लिहिले की, नाइस एक्सप्रेशन नव्या…यासोबतच हसण्याचे काही इमोजी देखील श्वेता बच्चन हिने शेअर केले.
आजोबा अमिताभ बच्चन यांच्यासोबत पहिल्यांदाच जाहिरातीमध्ये नव्या नंदा दिसली आहे. काही दिवसांपूर्वी नव्याच्या शोमध्ये जया बच्चन आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी म्हटले होते की, कोणतेही नाते चालवण्यासाठी शारीरिक आकर्षण आवश्यक असते. यानंतर अनेकांनी जया बच्चन यांच्यावर टिका केली. नव्याच्या या शोमध्ये काही दिवसांपूर्वी श्वेता बच्चनही सहभागी झाली होती. या शोमध्ये बोलताना अनेक विषयांवर जया बच्चन यांनी हात घातला.