वादानंतर नवाजुद्दीन सिद्दीकी याने घेतले एक पाऊल मागे, आलियासमोर ठेवली ही मोठी अट

| Updated on: Mar 24, 2023 | 4:03 PM

गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हा त्याच्या पर्सनल लाईफमुळे प्रचंड चर्चेत आलाय. नवाजुद्दीन सिद्दीकी याची पत्नी सतत त्याच्यावर गंभीर आरोप करताना दिसत आहे. आता या प्रकरणात मोठी अपडेट पुढे आलीये.

वादानंतर नवाजुद्दीन सिद्दीकी याने घेतले एक पाऊल मागे, आलियासमोर ठेवली ही मोठी अट
Follow us on

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) हा गेल्या काही दिवसांपासून सतत त्याच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी याची पत्नी सतत त्याच्यावर गंभीर आरोप करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी आलिया सिद्दीकी (Alia Siddiqui) हिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये (Video) आलिया सिद्दीकी ही नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या बंगल्याबाहेर मध्यरात्री उभी होती. यावेळी आलिया सिद्दीकी म्हणताना दिसली की, रात्री मला घराबाहेर काढण्यात आले असून माझ्याजवळ आता फक्त 81  रूपये आहेत. मी माझ्या लेकरांना इतक्या रात्री कुठे घेऊन जाऊ कळत नाहीये. या व्हिडीओनंतर अनेकांनी नवाजुद्दीन सिद्दीकी याच्यावर टिका केली.

नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याच्या एक्स पत्नीमधील वाद इतका जास्त वाढला की, हा वाद थेट कोर्टात पोहचला आहे. आलिया सिद्दीकी हिच्याविरोधात नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या आईने देखील तक्रार दाखल केलीये. आलिया सिद्दीकी ही सतत नवाजुद्दीन सिद्दीकी याच्यावर आरोप करत होती. मात्र, यादरम्यान नवाजुद्दीन सिद्दीकी काहीच बोलताना दिसला नव्हता.

शेवटी नवाजुद्दीन सिद्दीकी याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत काही मोठ्या गोष्टींचा खुलासा केलाय. आता नवाजुद्दीन सिद्दीकी याने एक पाऊल लेकरांसाठी मागे घेतल्याचे दिसत आहे. रिपोर्टनुसार आपला मुलांना भेटण्यासाठी नवाजुद्दीन सिद्दीकी आतुर आहे. एक्स पत्नीसोबत वाद सुरू असल्याने नवाजुद्दीन सिद्दीकी हा त्याच्या मुलांना भेटू शकत नाहीये.

रिपोर्टनुसार नवाजुद्दीन सिद्दीकी हा आपली केस मागे घेण्यास तयार आहे. मात्र, यासाठी नवाजुद्दीन सिद्दीकी याने एक अट ठेवली आहे. जर त्याच्या मुलांना त्याला भेटण्याची परवानगी दिली तर तो हेबियस कॉर्पस अर्ज मागे घेईल. कारण या वादामुळे गेल्या काही दिवसांपासून त्याच्या मुलांचे मोठे नुकसान होते आहे. या सर्व वादामुळे त्याचे मुले शाळेत जाऊ शकत नाहीयेत.

नवाजुद्दीन सिद्दीकी याची एक्स पत्नी आलिया सिद्दीक ही सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत सतत नवाजुद्दीन सिद्दीकी याच्यावर गंभीर आरोप करताना दिसत आहे. आलिया सिद्दीकी हिच्या आरोपांवर नवाजुद्दीन सिद्दीकी याने पत्राच्या माध्यमातून सडेतोड उत्तर दिले होते. आता या प्रकरणात आपल्या मुलांसाठी तडजोड करण्यास नवाजुद्दीन सिद्दीकी हा तयार झाला आहे. आता या प्रकरणात पुढे काय अपडेट येते हे पाहण्यासारखे ठरणार आहे.