मुंबई : नवाजुद्दीन सिद्दीकी याने आपल्या अभिनयाच्या जोरावर बाॅलिवूडमध्ये स्वत: चे वेगळे नाव कमावले आहे. आतापर्यंत अनेक हीट चित्रपटामध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीने (Nawazuddin Siddiqui) महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. नवाजुद्दीन सिद्दीकी याची फॅन फाॅलोइंग देखील जबरदस्त आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून नवाजुद्दीन सिद्दीकी आपल्या पर्सनल लाईफमुळे (Personal life) प्रचंड चर्चेत आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या पर्सनल लाईफमध्ये मोठे वादळ आल्याचे दिसत आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी याची पत्नी आलिया सिद्दीकी हिने अनेक गंभीर आरोप केले आहेत. इतकेच नाही तर नवाजुद्दीन सिद्दीकी आणि आलिया सिद्दीकी यांचा वाद आता थेट न्यायालयात पोहचला आहे. या दरम्यान दररोज धक्कादायक खुलासे देखील होत आहेत. मात्र, नवाजुद्दीन सिद्दीकीने यासर्व गोष्टींवर भाष्य करणे टाळल्याचे दिसतंय. आलिया हिच्या आरोपानंतर नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झालीये. काही दिवसांपूर्वी अंधेरी कोर्टाने (Andheri Court) याच प्रकरणात नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याच्या कुटुंबियांना नोटीसही पाठवली होती.
नवाजुद्दीन सिद्दीकी याला अंधेरी कोर्टात जबाब नोंदवण्यासाठी आज हजर होणे आवश्यक होते. मात्र, नवाजुद्दीन सिद्दीकी किंवा त्याच्या कुटुंबियांपैकी कोणतीच न्यायालयात हजर झाले नाही. याच प्रकरणातील पुढील सुनावणी आता १० फेब्रुवारीला होणार आहे. या दरम्यानच्या घडामोडीमुळे नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
हे सर्व सुरू असतानाच आता मोठा खुलासा करण्यात आलाय. नवाजुद्दीन सिद्दीकी याचे वकील नदीम जफर जैदी यांनी काही धक्कादायक खुलासे केले आहेत. जैदी यांनी सांगितले की, नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी आलिया सिद्दीकी अजूनही तिचा पहिला पती विनय भार्गव याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे.
आलिया हिने विनय भार्गव याच्यासोबत घटस्फोट न घेता नवाजुद्दीन सिद्दीकी याच्यासोबत लग्न केले. इतकेच नाही तर यावेळी तिने जैनब नाव ठेवून नवाजुद्दीन सिद्दीकी याच्यासोबत लग्न केले. नवाजुद्दीन सिद्दीकी याची पत्नी हिचा २०११ मध्येच घटस्फोट देखील झालाय.
इतकेच नाही तर धक्कादायक खुलासा करत नवाजुद्दीन सिद्दीकी याचे वकिल म्हणाले की, आलिया सिद्दीकी हिचे अनेक नावे देखील आहेत. अंजना पांडे, कामक्षा, जैनब, गायत्री असे तिचे असंख्य नावे आहेत. अलिया हिचे खरे नाव अंजना पांडे असल्याचे देखील वकिलाने नमूद केले आहे. आता पुढील सुनावणी ही १० फेब्रुवारीला होणार असून या सुनावणीमध्ये नेमके काय होते हे पाहण्यासारखे ठरणार आहे.