NCB Drug Raids LIVE Updates : शाहरुख खानला धक्का, आर्यनला 7 ऑक्टोबरपर्यंत कोठडी

| Updated on: Oct 04, 2021 | 10:31 PM

NCB Drug Raids LIVE Updates : अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (NCB) शनिवारी रात्री रेव्ह पार्टीवर केलेल्या कारवाईत बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक केली. नंतर कोर्टाने आर्यनसह तिघा आरोपींना एका दिवसाची एनसीबी कोठडी सुनावली. आर्यन खानसह तिन्ही आरोपींची रात्र एनसीबी कोठडीत गेली.

NCB Drug Raids LIVE Updates : शाहरुख खानला धक्का, आर्यनला 7 ऑक्टोबरपर्यंत कोठडी
Aryan Shah rukh khan
Follow us on

NCB Drug Raids LIVE Updates : अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (NCB) शनिवारी रात्री रेव्ह पार्टीवर केलेल्या कारवाईत बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आलं असून त्याच्यासह इतर दोघांना एका दिवसाची एनसीबी कोठडी सुनावण्यात आली होती. शाहरुखच्या लेकाने कालची रात्र एनसीबी कोठडीत घालवली. आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांची रात्र एनसीबी कोठडीत गेली. त्यानंतर त्यांना आज पुन्हा कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी अडीच तास दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर कोर्टाने तीनही आरोपींच्या कोठडीत 7 ऑक्टोबरपर्यंत वाढ केली.

एनसीबीने  आर्यन खानसह आठ जणांना ताब्यात घेतलं आहे. यामध्ये अरबाझ मर्चंट, मूनमून धमेचा, नुपूर सारिका, इस्मित सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत चोकेर आणि गोमित चोप्रा यांचा समावेश आहे. एनसीबीने शनिवारी रात्रभर या सगळ्यांची कसून चौकशी करुन त्यांचे जबाब नोंदवले आहेत. आर्यन खानसह आठ जणांची वैद्यकीय चाचणी करुन त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी न्यायालयाने आर्यनसह दोघांना एका दिवसाची एनसीबी कोठडी सुनावली आहे. दरम्यान, रविवारी रात्री दबंग खान सलमान रात्री 10 च्या आसपास शाहरुखच्या घरी पोहोचला. अर्धा तास त्याच्याशी चर्चा केल्यानंतर तो शाहरुखच्या घराबाहेर पडला. या भेटीत त्याने शाहरुखला धीर दिल्याची माहिती आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 04 Oct 2021 07:47 PM (IST)

    शाहरुखचा स्पेन दौरा रद्द

    एनसीबीकडून आर्यनला अटक करण्यात आल्याने शाहरुख खानने त्याचा स्पे दौरा रद्द करण्यात आला आहे. शाहरुख त्याच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी स्पेनला जाणार होता. पण त्याचा हा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे.

  • 04 Oct 2021 06:10 PM (IST)

    3 आरोपींना 7 ऑक्टोबरपर्यंत कोठडी, इतर 5 आरोपींबाबत सुनावणी सुरु

    3 आरोपींना 7 ऑक्टोबरपर्यंत कोठडी, इतर 5 आरोपींबाबत सुनावणी सुरु


  • 04 Oct 2021 06:08 PM (IST)

    आरोपींकडे काहीही मिळालेलं नाही, अरबाजची बाजू मांडणाऱ्या वकिलाचा दावा

    आरोपींकडे काहीच मिळालेलं नाही. आरोपींच्या व्हाट्सअॅप चॅटचाही काही संबंध नाही, जे इतर आरोपी आहेत त्यांच्यासोबत समोरासमोर चौकशी होण्यासाठी अरबाज मर्चंट आणि इतर दोन आरोपींची कोठडी वाढवण्यात आली

     कोर्टात नेमका युक्तीवाद कसा झाला?

  • 04 Oct 2021 06:05 PM (IST)

    आर्यन खान याच्याकडे कोणतंही ड्रग्ज सापडलेलं नव्हतं, वकील सतीश मानेशिंदे यांचा कोर्टात दावा

    सतिश मानेशिंदे यांचा कोर्टात नेमका काय दावा?

    आर्यन खान याच्याकडे कोणतंही ड्रग्ज सापडलेलं नव्हतं. तसेच त्याकडे बोर्डिंग पास नव्हता. त्याला पार्टीचं निमंत्रण देण्यात आलं होतं. त्यामुळे तो पार्टीसाठी गेला होता. त्याची बॅग चेक करण्यात आली तेव्हा त्याच्या बॅगेतही काहीच मिळालं नाही. त्याचा मित्र अरबाज याच्याकडे 6 ग्रॅम चरस सापडलं. त्याचबरेबर दिल्लीची मॉडेल मुनमुन धरेजा हिच्याकडे 5 ग्रॅम चरस सापडलं होतं. या दोन आरोपींकडे सापडलेल्या ड्रग्सशी अरबाजचा संबंध नाही, असं अरबाजची बाजू मांडणारे वकील सतीश मानेशिंदे यांनी कोर्टात सांगितलं

     

     

  • 04 Oct 2021 05:49 PM (IST)

    शाहरुख खानला धक्का, आर्यनला 7 ऑक्टोबरपर्यंत कोठडी

    ड्रग्जप्रकरणात आर्यन खानला तूर्तास दिलासा नाहीच, शाहरुख खानच्या लेकाला 7 ऑक्टोबरपर्यंत कोठडी, मुंबईतील किला कोर्टाचा मोठा निर्णय

  • 04 Oct 2021 04:11 PM (IST)

    आर्यन खान निर्दोष, तो पार्टीत पाहुणा म्हणून गेला, वकील सतीश मानेशिंदेंचा कोर्टात दावा

    आर्यनकडे ड्रग्ज सापडलं नाही. तसेच त्याला पाहुणा म्हणून पार्टीत नेलं होतं, आर्यनची बाजू मांडणारे वकील सतीश मानेशिंदे यांचा कोर्टात दावा, तर अरबाजकडे 6 ग्रॅम चरस सापडलं, एनसीबी वकिलांचा कोर्टात दावा

  • 04 Oct 2021 03:58 PM (IST)

    किला कोर्टात आर्यनसह 9 जणांवर सुनावणी सुरु, एनसीबीची रिमांडची मागणी

    किला कोर्टात आर्यन खानसह 9 जणांवर सुनावणी सुरु, एनसीबीची रिमांडची मागणी, कोर्टात सध्या सुनावणी सुरु, क्रूझ ड्रग्ज पार्टीचं आंतरराष्ट्रीय कनेक्शन असल्याचा एनसीबीचा दावा, त्याबाबतच्या तपासासाठी 11 ऑक्टोबरपर्यंत कोठडी मिळावी, एनसीबीची मागणी, आर्यनच्या चॅटमध्ये धक्कादायक माहिती मिळाल्याचा एनसीबीचा दावा

  • 04 Oct 2021 03:03 PM (IST)

    आर्यन खानसह इतर आरोपी किला कोर्टात दाखल, थोड्याच वेळात सुनावणी सुरु होणार

    आर्यन खानसह इतर आरोपी किला कोर्टात दाखल, थोड्याच वेळात सुनावणी सुरु होणार, आर्यनला कस्टडी मिळणार की जामीन मिळणार ते लवकरच स्पष्ट होणार

  • 04 Oct 2021 02:46 PM (IST)

    आर्यन खान आणि इतर दोन आरोपींना घेऊन एनसीबी अधिकारी किला कोर्टाच्या दिशेला रवाना

    आर्यन खान आणि इतर दोन आरोपींना घेऊन एनसीबी अधिकारी किला कोर्टाच्या दिशेला रवाना, किला कोर्टात तिघांना हजर केलं जाणार,  किला कोर्टात एनसीबी कस्टडीची मागणी करणार, तर आर्यनचे वकील सतीश मानशिंदे युक्तीवाद केला, दुसरीकडे रात्रभरच्या चौकशीत एनसीबीच्या हाती नवी माहिती मिळाली आहे का, त्याची माहिती सरकारी वकील न्यायालयात सांगतील

  • 04 Oct 2021 01:50 PM (IST)

    क्रूजच्या झाडाझडतीत NCB अधिकाऱ्यांना आणखी ड्रग्ज सापडलं, आणखी 8 जण पोलिसांच्या ताब्यात

  • 04 Oct 2021 01:15 PM (IST)

    आम्ही बॉलिवूडला टार्गेट करत नाही : समीर वानखेडे

    बॉलिवूड सेलिब्रिटींविरोधात सातत्याने कारवाई करण्यासाठी ओळखले जाणारे एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. “असं अनेकवेळा घडलं आहे की आमच्यावर आरोप झाले आहेत की आम्ही बॉलिवूडला टार्गेट करत आहोत, पण कोणाच्याही आरोपांवर बोलण्याऐवजी आम्ही तथ्यांवर बोलतो आणि आकडेवारीवरही जास्त बोलतो. गेल्या वर्षी, आम्ही 10 महिन्यांत एकूण 105 लोकांवर गुन्हे दाखल केले, तुम्ही सांगा यापैकी किती सेलिब्रिटी होते? या वर्षी देखील आम्ही 310 लोकांना अटक केली आहे, त्यापैकी किती सेलिब्रिटी आहेत? आम्ही 150 कोटी रुपयांची औषधे जप्त केली आहेत पण त्यावर कोणी बोलत नाही.”

  • 04 Oct 2021 01:11 PM (IST)

    जेजे हॉस्पिटलमध्ये आर्यनचं मेडिकल होणार

    एनसीबीची टीम आर्यन खान, मुनमुन धामोचा आणि अरबाज मर्चंटसह जेजे हॉस्पिटलमध्ये पोहोचली आहे. तिघांचीही पुन्हा मेडिकल टेस्ट होणार आहे. आर्यन खानची आरटीपीसीआर चाचणी देखील जेजे हॉस्पिटलमध्ये करण्यात आली आहे.

  • 04 Oct 2021 01:10 PM (IST)

    NCB आजही आर्यन खानसाठी कस्टडी मागणार : समीर वानखेडे

    एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी म्हटले आहे की, एनसीबी अजूनही आर्यन खानसाठी कस्टडी मागेल. तशी मागणी आम्ही किला कोर्टात करणार आहोत. ते म्हणाले- ‘काल संध्याकाळी झालेल्या चौकशीसंदर्भात आणि निष्कर्षासंदर्भात मी काहीही प्रसारमाध्यमांना सांगू शकत नाही, परंतु आम्हाला यात अधिक तपास करण्याची गरज आहे.’

  • 04 Oct 2021 01:07 PM (IST)

    मेडिकल टेस्ट करुन तिघांना कोर्टात हजर करणार

    मेडिकल टेस्ट करुन तिघांना कोर्टात हजर केलं जाणार

    पुढच्या तासाभरात किला कोर्टात हजर करणार

  • 04 Oct 2021 01:03 PM (IST)

    आर्यनचं शाहरुखशी फोनवरुन बोलणं

    एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनसीबीने आर्यन खानला शाहरुख खानशी बोलण्यास परवानगी दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यन चौकशीदरम्यान सतत रडत होता. त्याने गेल्या 4 वर्षांपासून ड्रग्जचे सेवन केल्याची कबुलीही दिली आहे. आर्यनने भारताबाहेर यूके, दुबई आणि इतर देशांमध्ये ड्रग्जचे सेवन केले आहे.

  • 04 Oct 2021 01:01 PM (IST)

    एनसीबीने आर्यनच्या लेन्स कव्हरमधून ड्रग्ज जप्त केली

    एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यन खानच्या डोळ्याच्या लेन्सच्या कव्हरमधून ड्रग्ज जप्त करण्यात आली आहेत. याशिवाय, पार्टीमध्ये उपस्थित असलेल्या मुनमुन धामिचाने सॅनिटरी पॅडच्या दरम्यान औषधे लपवली होती. याशिवाय, अरबाज मर्चंटबद्दल असं बोलले जातंय की त्याने ड्रग्स त्याच्या शूजमध्ये लपवून ठेवली होती. याशिवाय या प्रकरणात अटक केलेल्या इतर 5 पैकी दोन आरोपींनी ड्रग्ज फेकण्याचा प्रयत्नही केला होता. आर्यन खानच्या फोनच्या व्हॉट्सअॅप चॅटमधूनही एक महत्त्वाचा खुलासा झाला आहे. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, तो काही ड्रग्ज विक्रेत्यांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाली आहे.

  • 04 Oct 2021 11:36 AM (IST)

    एनसीबीच्या सूत्रांनुसार ते आर्यन खान, अरबाज मर्चेंट आणि मुनमुन धामेचा यांच्या एनसीबी कोठडीची मागणी आज पुन्हा करणार

    एनसीबीच्या सूत्रांनुसार जर आर्यनला या कार्यक्रमात अतिथी म्हणून आमंत्रित केले गेले असेल तर त्याला यासाठी काही आमंत्रण किंवा काही प्रकारचे प्रस्ताव असायला हवा होता. परंतु त्याच्याकडे असे कोणतेही आमंत्रण किंवा प्रस्ताव नाही .. तो फक्त असे म्हणत आहे की त्याला आमंत्रित केले गेले होते , मग ते कोणी केले, तो योग्य प्रकारे सांगू शकला नाही आणि अरबाजला प्रत्येक गोष्टीची माहिती होती असे म्हणत तो टाळत आहे. बोर्डिंग पास शिवाय आर्यनला एंट्री देणारा कोण होता .. कोणी त्याला आमंत्रित केले होते … हेच कारण होते की एनसीबीने प्राथमिक चौकशीच्या आधारावर 2 दिवसाची कस्टड़ी मागितली

  • 04 Oct 2021 11:11 AM (IST)

    NCB पुन्हा क्रूझवर छापेमारी करणार, सूत्रांची माहिती, सहा संशयितांची झाडाझडती

    कॉर्डिला द एम्प्रेस या क्रूझवर पुन्हा एकदा एनसीबीची छापेमारी, एक टीम क्रूझवर पोहोचली, टिममध्ये सात ते आठ अधिकारी, सहा संशयितांची झाडाझडती सुरू असल्याची सूत्रांची माहिती, एनसीबी आर्यन खानची कोठडी मागण्याच्या तयारीत. श्रेयस नायरसोबतच्या चॅट्समधून अनेक खुलासे होणार असल्याची शक्यता, आज समीर वानखेडे पुन्हा अॅक्शन मोडमध्ये, काही ठिकाणी छापेमारीची शक्यता

  • 04 Oct 2021 08:57 AM (IST)

    आर्यन शाहरुख खानला आज जामीन मिळण्याची शक्यता

    शाहरुख खानचा मुलगा आर्यन, जो मुंबईत क्रूझवर रेव्ह पार्टीमध्ये पकडला गेला होता, त्याला आज जामीन मिळण्याची शक्यता.

    – एनसीबी आर्यन खानच्या कोठडीची मागणी करणार नाहीत, कालच त्यांना दोन दिवसांची कोठडी मागितली होती पण कोर्टाने ती दिली नाही… केवळ एक दिवसांची कोठडी दिल्याने आत्ता एनसीबी अधिक कोठडी मागणार नाही अशी माहिती सुत्रांकडून मिळतेय

    – सोमवारी आर्यनची कोठडी संपणार आहे, त्यापूर्वी त्याचे वकील जामिनासाठी २ वा. अर्ज करणार असल्याची माहिती

    – आर्यन खानच्या खटल्याची वकिली सतीश मानशिंदे करत आहेत. त्यांनी रिया चक्रवर्तीची वकिलीही केली होती

  • 04 Oct 2021 08:02 AM (IST)

    आर्यन खानसह तिन्ही आरोपींची रात्र एनसीबी कोठडीत!

    शाहरुखच्या लेकाने कालची रात्र एनसीबी कोठडीत घालवली. आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांची रात्र एनसीबी कोठडीत गेली.

  • 03 Oct 2021 11:00 PM (IST)

    अभिनेता सलमान खान शाहरुख खानच्या घरी पोहोचला

    अभिनेता सलमान खान शाहरुख खानच्या घरी पोहोचला

    आर्यन खानच्या अटकेनंतर सलमान कान शाहरुखच्या घरी पोहोचला.

    सलमान शाहरुखची भेट घेण्यासाठी सलमानच्या घरी पोहोचला आहे.

  • 03 Oct 2021 08:06 PM (IST)

    आर्यन खानसह दोन आरोपी एनसीबी कार्यालयात दाखल, आजची रात्र जेलमध्येच

    आर्यन खानसह इतर दोन आरोपी एनसीबी कार्यालयात दाखल

    आर्यन खान आणि इतर आरोपी एनसीबी जेलमध्येच राहणार

  • 03 Oct 2021 07:50 PM (IST)

    मुंबई-गोवा क्रूझ रेव्ह पार्टी, ड्रग्ज प्रकरण, आर्यन खानला एका दिवसाची कोठडी

    शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन यांनाही एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. एनसीबीच्या वकिलांनी या आरोपींची दोन दिवसांची कोठडी मागितली होती. मात्र कोर्टानं या तीन आरोपींना एक दिवसाची कोठडी सुनावण्यात आली आहे. आता उरर्वरित पाच आरोपींना पोलीस कोर्टात कधी हजर करतात हे पाहावं लागणार आहे.

     

  • 03 Oct 2021 07:29 PM (IST)

    आर्यन खानला 5 ऑक्टोबरपर्यंत कोठडी देण्याची मागणी 

    सतिश माने-शिंदे आर्यनची बाजू मांडत आहेत

    एनसीबीने आर्यनची कोठडी मागितली आहे

    5 ऑक्टोबरपर्यंत कोठडी देण्याची मागणी

  • 03 Oct 2021 07:11 PM (IST)

    आर्यन खानला किला कोर्टात करण्यात आलं हजर, सुनावणीला सुरुवात

    आर्यन खानला किला कोर्टात करण्यात आलं हजर

    कोर्टात सुनावणीला सुरुवात झाली आहे.

    न्यायाधीश काय निर्णय देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे

  • 03 Oct 2021 07:03 PM (IST)

    आर्यन खानला किला कोर्टात करण्यात आलं हजर

    आर्यन खानला किला कोर्टात हजर करण्यात आलं

    आर्यन खानसोबत इतर दोघांना न्यायालयासमोर हजर करण्यात आलं

    थोड्याच वेळात युक्तीवादाला सुरुवात होणार.

  • 03 Oct 2021 06:48 PM (IST)

    आर्यन खानला किला कोर्टात करण्यात आलं हजर

    आर्यन खानला मुंबईच्या किला कोर्टात नेण्यात आलंय.

    न्यायाधिशांसमोर त्याला हजर करण्यात येणार आहे

    सध्या आर्यन खानला एनसीबीने अटक केलं आहे.

  • 03 Oct 2021 06:05 PM (IST)

    रेव्ह पार्टी प्रकरणात जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी- देवेंद्र फडणवीस

    रेव्ह पार्टी प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी

    विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य

  • 03 Oct 2021 05:41 PM (IST)

    शाहरुख खानचा मॅनेजर पूजा ददलानी वकिलांसह किल्ला कोर्टात दाखल

    शाहरुख खानचा मॅनेजर पूजा ददलानी किल्ला कोर्टात दाखल

    ददलानी यांच्यासोबत वकील सतीश मानेशिंदेदेखील कोर्टात दाखल

  • 03 Oct 2021 05:05 PM (IST)

    पार्टीमध्ये ड्रग्ज नेल्याचे आर्यनने केले कबुल

    पार्टीमध्ये ड्रग्ज नेल्याची आर्यनची कबुली

    एनसीबीच्या अधिकाऱ्यांसमोर ड्रग्ज नेल्याची दिली कबुली

    टीव्ही 9 मराठीला सूत्रांची माहिती

  • 03 Oct 2021 04:44 PM (IST)

    आरोपींना पुन्हा एनसीबी ऑफिसला आणण्यात आलं 

    मुंबई- किल्ला कोर्टात जज नसल्याने आरोपींना पुन्हा एनसीबी ऑफिसला आणण्यात आलं

    – आता आरोपींना मॅजिस्ट्रेटच्या बंगल्यावर नेण्यात येईल

    -किंवा न्यायाधीश आल्यानंतर आरोपींना पुन्हा किल्ला कोर्टात नेण्यात येणार

  • 03 Oct 2021 04:05 PM (IST)

    एनसीबीकडून शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक

    शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबीने अखेर अटक केली आहे. आर्यनने स्वत:च्या लेन्समधून ड्रग्ज नेलं होतं, अशी कबूली त्याने स्वत: दिली होती. एनसीबी अधिकारी आर्यनला वैद्यकीय तपासणीसाठी जे जे रुग्णालयात घेऊन गेले आहेत.

  • 03 Oct 2021 03:51 PM (IST)

    रेव्हा पार्टी प्रकरणात मोठी कारवाई, एका ड्रग्ज पेडलरला एनसीबीच्या ऑफिसमध्ये आणले

    रेव्हा पार्टी प्रकरणात मोठी कारवाई

    एका ड्रग्ज पेडलरला एनसीबीच्या ऑफिसमध्ये आणले

    चौकशी सुरु

  • 03 Oct 2021 03:50 PM (IST)

    शाहरुख खानच्या घरातून आणखी एक कार निघाली, आर्यन अजूनही एनसीबीच्या ताब्यात

    शाहरुख खानच्या घरातून आणखी एक कार निघाली

    कारमध्ये दोन माणसे बसलेली

    अजूनही आर्यन एनसीबीच्या ताब्यात,

  • 03 Oct 2021 01:38 PM (IST)

    13 पैकी 8 लोक एनसीबीच्या ताब्यात, कसून चौकशी सुरु

    मिळालेल्या माहितीनुसार, मोहक, नुपूर आणि गोमित हे दिल्लीचे रहिवासी आहेत. मोहक एक फॅशन डिझायनर आहे तर नुपूर देखील या व्यवसायाशी संबंधित आहे. नुपूर हा दुसरी आरोपी गोमितसोबत मुंबईत आली होती. गोमित हेअर स्टायलिस्ट आहे. ताब्यात घेतलेल्यांपैकी दोघे हरियाणा आणि दिल्ली येथील ड्रग तस्कर आहेत. या पार्टीत प्रवेशासाठी प्रत्येक व्यक्तीने 80 हजार रुपयांपेक्षा जास्त फी भरली होती.

  • 03 Oct 2021 01:36 PM (IST)

    कसून चौकशी सुरु, जो कुणी दोषी, त्याच्यावर कारवाई होणार : NCB प्रमुख एस.एन. प्रधान

  • 03 Oct 2021 01:35 PM (IST)

    कुणीही असू द्या, कारवाई ही होणारच : NCB प्रमुख एस.एन. प्रधान

    एनसीबीचे प्रमुख एसएन प्रधान म्हणाले की, 8 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. या लोकांकडून जे इनपुट मिळत आहेत ते लक्षात घेता पुढील अनेक दिवस ही चौकशी चालेल. या नेटवर्कमध्ये जो कोणी सापडेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल,ते मग कुणीही असो.

  • 03 Oct 2021 01:32 PM (IST)

    मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर क्रूझमध्ये रेव्ह पार्टी, NCB च्या रडारवर गोपाल आनंद नावाचा व्यक्ती

    मुंबई किनारपट्टीवरील क्रूझमधील कथित रेव्ह पार्टी प्रकरणामधील सूत्रांच्या हवाल्याने मोठी बातमी येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपाल आनंद नावाची व्यक्ती या प्रकरणात एनसीबीच्या रडारवर आहे. सूत्रांनी सांगितले की, गोपाल आनंद या व्यक्तीने पार्टीचे आयोजन केलं, त्यांना शंका आहे की या जहाज पार्टीत त्याची मोठी भूमिका आहे. एनसीबी गोपाल आनंदचा शोध घेत आहे पण तो बेपत्ता असल्याचे समोर येतंय.

  • 03 Oct 2021 12:28 PM (IST)

    पार्टीसाठी 5 लाखांपर्यंत होती एन्ट्री फी

    या पार्टीसाठी तगडी फी वसूल करण्यात आली होती. ज्या जहाजावर ही पार्टी सुरू होती, ते जहाज कॉर्डेलिया क्रूझ कंपनीचे होते. ही पार्टी फॅशन टीव्ही इंडिया आणि दिल्लीच्या Namascray Experience नावाच्या कंपनीने आयोजित केली होती. भर समुद्रात होणाऱ्या या पार्टीसाठी 60 हजारापासून ते 5 लाखापर्यंतची फी ठेवण्यात आली होती.

  • 03 Oct 2021 12:27 PM (IST)

    मला पार्टीत पाहुणा म्हणून बोलावलं, शाहरुखच्या मुलाचा दावा

    आर्यन याची कसून चौकशी केली असता मला या पार्टीत केवळ पाहुणा म्हणून बोलावलं होतं. मी या पार्टीत सहभागी होण्यासाठी पैसे भरले नव्हते. ऑर्गनायजरने माझ्या नावाचा वापर करून लोकांना पार्टीत बोलावलं होतं, असा दावा आर्यनने केल्याचं सूत्रांनी सांगितलं. तसेच आर्यनचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. त्याचे व्हॉट्सअॅप चॅटही तपासले जात आहेत. रेव्ह पार्टीबाबत या चॅटमध्ये काही चर्चा झाली होती का? या रेव्ह पार्टी पूर्वीपासूनच सुरू आहेत का? आदी माहिती एनसीबी घेत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

  • 03 Oct 2021 12:27 PM (IST)

    शाहरुखच्या मुलाची कसून चौकशी

    अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानलाही अटक करण्यात आली आहे. एनसीबीने त्याची चौकशीही सुरू केली आहे. एनसीबीच्या हाती क्रूझवरील पार्टीचा व्हिडीओ सापडला असून या व्हिडीओतील अॅक्टिव्हीटी पाहून एनसीबी नेमकं अनुमान काढणार असल्याचं सांगितलं जातं.

  • 03 Oct 2021 12:26 PM (IST)

    2 ऑक्टोबरला क्रूझवर छापा, कोकीन, एमडी आणि चरस जप्त, 10 ते 12 जण ताब्यात

    या रेव्ह पार्टीवर छापेमारी केल्याचं एनसीबीने अधिकृतपणे स्पष्ट केलं आहे. 2 ऑक्टोबर रोजी कॉर्डेलिया क्रूजवर छापा मारण्यात आला. तिथल्या उपस्थित असलेल्या सर्वांचा तपास करणअयात आला. यावेळी एमडीएमए, कोकीन, एमडी आणि चरस जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी एकूण 8 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यात दोन महिलांचा समावेश आहे. या महिला बॉलिवूडशी संबंधित आहे का? या महिला नेमक्या कोण आहेत? त्यांचे बॅकग्राऊंड काय आहे? याबाबतची माहिती गुप्त ठेवण्यात आली आहे. एनसीबीने या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून याप्रकरणाचा तपास सुरू केला आहे.